निवडणूक आयोगाकडून एसआयआर प्रक्रियेत महत्वपूर्ण बदल

नवी दिल्ली/12 जुलै -भारतीय निवडणूक आयोगाने देशभरातील विशेष सखोल पुनरावलोकन अर्थात एसआयआर प्रक्रियेत एका बदलाची घोषणा केली आहे. निवडणूक आयोगाने एसआयआरमध्ये समाविष्ट नसलेल्या विद्यमान मतदारांनासोबतच मतदार यादीत समावेशासाठी अर्ज करणार्‍या नवीन अर्जदारांनाही त्यांच्या पालकांचा एसआयआर तपशील अनिवार्य करण्याात आला आहे. फॉर्म 6 अशा लोकांसाठी आहे जे 18 वर्षांचे झाले आहेत. भारतीय नागरिकत्व प्राप्त करून मतदार बनू इच्छितात किंवा ज्यांची नावे मतदार यादीतून वगळण्यात आली होती आणि जे पुन्हा अर्ज करू इच्छितात. निवडणूक आयोगाने एसआयआर
प्रक्रियेच्या मध्यात हा बदल केला आहे. यामुळे मतदारांची ओळख पटवण्यास मदत होते आणि नवीन मतदारांना अर्जासोबत
सादर कराव्या लागणार्‍या कागदपत्रांची संख्या कमी होते, असा दावा निवडणूक आयोगाच्या अधिकार्‍यांकडून करण्याळत
आला आहे.

संबंधित बातम्या

Back to top button