खाकी वर्दीतील अधिकारी की संघाचा प्रचारक?

नांगरे पाटील यांच्यावर काँग्रेसचे पुन्हा आरोप, मुख्यमंत्र्यांवर प्रश्नांची सरबत्ती

नागपूर/26 जून: धडक कार्यपद्धती आणि वक्तृत्व कलेसाठी महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेले ज्येष्ठ आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांची नागपूरचे पोलीस आयुक्त म्हणून बदली होताच नवीन वाद उद्भवला आहे. सकल हिंदू समाजाच्या संमेलनात प्रमुख वक्ता म्हणून बोलताना त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविषयी गौरवोद्गार काढल्याची चित्रफीत प्रसारित करत काँग्रेसने त्यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर शुक्रवारी एक्स माध्यमांवर काँग्रेसने सेवा नियमांचा दाखला देत नांगरे पाटील आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. सेवा नियम काय सांगतात-पहिला प्रश्न-अखिल भारतीय सेवा नियम 1968 मधील नियम 13(2)(ष)(ळळळ) नुसार एखाद्या आयपीएस अधिकार्‍याला खाजगी माध्यम व्हिडिओ किंवा तत्सम कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी सरकारची पूर्वपरवानगी आवश्यक असते. विश्वास नांगरे पाटील हे उपस्थित राहिलेल्या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र गृहविभागाची किंवा राज्य सरकारची पूर्वपरवानगी घेतली होती का? घेतली होती तर ती कोणत्या नियमांतर्गत देण्यात आली होती त्याची प्रत सार्वजनिक केली जाणार का? जर परवानगी घेतली नसेल तर ही सेवा नियमांचे उल्लंघन असून सरकार कारवाई करणार का?

काँग्रेसचे आरोप काय?

भारतीय संविधानाची शपथ घेऊन, सर्व नागरिकांना समान वागणूक देण्याची जबाबदारी स्वीकारून एक आयपीएस अधिकारी सेवेत प्रवेश करतो. त्याची ओळख कोणत्याही धर्म, जात, पक्ष किंवा विचारधारेशी नसते; त्याची ओळख फक्त आणि फक्त संविधानाशी असते. मात्र, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मंचावर जाऊन संघ, हिंदुत्व आणि डॉ. हेडगेवार यांचे गौरवगान करताना नांगरे पाटील यांचे भाषण पाहिल्यानंतर एक मूलभूत प्रश्न उभा राहतो. ते संविधानाचे अधिकारी म्हणून बोलत होते की एका विशिष्ट विचारधारेचे प्रतिनिधी म्हणून? आता प्रश्न नांगरे पाटील यांच्या पुरता मर्यादित राहिलेला नाही.

संबंधित बातम्या

Back to top button