महर्षी वाल्मिकी पायी दिंडी सोहळ्याचे खालखोनी वरुन पंढरपूरकडे प्रस्थान

खोलापुर/22 जून– येथुन जवळच असलेल्या खालखोनी गावातुन प्रतीवर्षी प्रमाणे या वर्षी सुध्दा खालखोनी सामदा काशीपुर ते श्री क्षेत्र पंढरपुरकडे 19 जुनला दिंडी प्रमुख तथा महर्षी वाल्मिकी पायी दिंडी चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष श्री ह.भ.प. रविंद्र महाराज पाटील खालखोनीकर यांच्या नेतृत्वाखाली प्रस्थान झाले असुन. या वर्षी पायी दिंडीचे 11 वे वर्षे आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील खालोद येथील नर्मदेश्वर महादेव मंदिरातून महर्षी वाल्मिकी पायी दिंडीचा अकरावा वार्षिक सोहळा पंढरपूरकडे मोठ्या भक्तिभावात मार्गस्थ झाला आहे. दिंडीचे प्रमुख रवींद्र महाराज पाटील खालोदकर यांच्या मार्गदर्शनाखाली 19 जून रोजी सकाळी विधिवत अभिषेक आणि पूजा करण्यात आली. त्यानंतर संपूर्ण खालोद गावातून एक भव्य आणि मंगलमय दिंडी काढण्यात आली. या दिंडी सोहळ्यात सुनील दादा जिवनराव घाडगे, सुभाषराव समाधान घाडगे, राम घुगरावाडी, राजूभाऊ राऊत, नारायण महाराज दुजे, युवराज दादा वानखडे, राजूभाऊ वानखडे, गोलू महाराज निमकर, सार्थक महाराज गाळे, रमेश महाराज गाळे, समर गाळे, सुनील महाराज खुजे, विशाल महाराज वाकोडे, ज्ञानेश्वर महाराज सातव, उमेश महाराज राऊत, शुभम महाराज राऊत, ज्ञानेश्वर महाराज पाटील खालोदकर, तन्मय महाराज झासकर, ईश्वर महाराज धांडगे, रामेश्वर महाराज घाडगे, पंढरी महाराज घाडगे, धनराज खोडे, गजानन टोकाडे, संजय भाऊ भुसाडे, मनोज भाऊ राऊत, बाळू अडसूळ, पुरुषोत्तम महाराज पुस्तके, दिनेश भारसाकळे आणि मंगेश सुलतान खालोदकर हे प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
पंढरपूर येथे महर्षी वाल्मिकी मठासाठी आठ गुंठे जागा निश्चित करण्यात आली असून, याच्या उभारणीसाठी एकूण पन्नास लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. हे पवित्र कार्य पूर्ण करण्यासाठी भाविक भक्तांनी सढळ हाताने मदत करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे पाच हजार रुपयांपेक्षा अधिक देणगी देणार्या सर्व दानशूरांची नावे मठावर कायमस्वरूपी कोरली जाणार आहेत. 18 जुलै रोजी ही दिंडी पंढरपुरात प्रवेश करेल आणि 29 जुलै रोजी सकाळी गोपाळपूर येथे काल्याचे कीर्तन होऊन सोहळ्याची सांगता होईल. या सोहळ्यादरम्यान 19 ते 26 जुलै या कालावधीत पंढरपूर येथे निलेश महाराज सुरंदसे यांच्या मुखातून भागवत कथेचे रसपान घडणार आहे. दिंडीचा मुक्काम पंढरपूर येथील चंद्रभागा तीरावरील दीनदयाळ महादेव मंदिर परिसरात असेल.



