भुसावळमध्ये भीषण अपघात; 4 जण ठार

भुसावळ/5 जून : वरणगावजवळ राष्ट्रीय महामार्गावर शुक्रवारी दुपारी एक अत्यंत हृदयद्रावक आणि भीषण अपघाताची घटना घडली. एक भरधाव चारचाकी वाहन आणि दुचाकी यांच्यात झालेल्या जोरदार धडकेत दुचाकीवरील एकाच कुटुंबातील महिला, दोन तरुण आणि एका वर्षभराच्या चिमुरडीचा जागीच मृत्यू झाला. हे सर्व मृत मलकापूर येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली. या घटनेमुळे संपूर्ण मलकापूर परिसरावर शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मलकापूर येथील रहिवासी असलेले हे चारही जण एकाच दुचाकीवरून वरणगावकडे जात होते. दुपारी 2 वाजेच्या सुमारास त्यांची दुचाकी वरणगाव बायपासजवळ आली असता, राष्ट्रीय महामार्गावरून जाणार्‍या एका भरधाव चारचाकी वाहनाने (क्रमांक: चक-19 एत-5353) त्यांच्या दुचाकीला समोरून जोरदार धडक दिली. या अपघातात 1 वर्षाच्या चिमुरडीसह चौघेही जण गंभीर जखमी झाले. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतकार्य सुरू केले. जखमींना जळगाव जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर चौघांनाही मृत घोषित केले.

संबंधित बातम्या

हे सुद्धा वाचा
Close
Back to top button