अखेर प्रवीण पोटेंच्या नावावरच शिक्कामोर्तब
अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून भाजपकडून

उमेदवारी अर्ज 1 जूनला दाखल करणार
महायुतीत राज्यांतील 2 जागांवर पेच
तिढा लवकर सुटण्याचा भाजप नेत्यांना विश्वास
अमरावती /28 मे- अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून भाजपने माजी मंत्री प्रवीण पोटे पाटील यांना तिसर्यांदा उमेदवारी जाहीर केली असून, पोटे पाटील 1 जूनला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
अमरावती स्थानिक स्वराज्य मतदारसंघातील राजकारण नेहमीच चर्चेत असते. प्रवीण पोटे पाटील यांनी 2012 मध्ये पहिल्यांदा विजय मिळवून विधानपरिषदेत प्रवेश केला होता. त्यानंतर 2018 च्या निवडणुकीत त्यांनी काँग्रेस उमेदवाराचा धुव्वा उडवत ऐतिहासिक विजय नोंदवला होता. आता तिसर्यांदा ते रिंगणात उतरत आहेत. भारतीय जनता पक्षाने अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकीला प्रवीण पोटे यांचे नाव निश्चित केल्यावर आज दि.29 मे रोजी राज्याचे महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रवीण पोटे उमेदवारी अर्ज भरणार होते.त्यांच्या समर्थनार्थ भाजप तर्फे मोठी जंगी तयारी सुरू झाली होती.जिल्ह्याचे सर्व भाजप आमदार व राज्यसभा सदस्य खा.डॉ.अनिल बोंडे यांचीही उपस्थिती राहणार होती.भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये अत्यंत उत्साही वातावरण असतांना राज्य भाजप पदाधिकार्यांकडून उद्या उमेदवारी अर्ज न भरता,दि.31 मे किंवा 1 जूनला मेदवारी अर्ज भरण्याचे सुचना प्राप्त झाली.
राज्यातील 17 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीतील महायुतीत जागावाटपात दोन जागांची ओढाताण सुरू असून त्यासंदर्भात अंतिम निर्णय झाल्यावरच महायुतीचे उमेदवार आपला उमेदवारी अर्ज एकाचवेळी राज्यात भरणार असल्याचे कळते.दोन जागांवर अडलंय,असं खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच परवा पत्रकारांशी बोलतांना सांगितले होते.हा तिढा लवकरच सुटेल,असा विश्वास भाजप नेत्यांनी व्यक्त केला आहे.
मंडल मीडिया हाऊसचा दावा खरा ठरला
मंडल मीडिया हाऊसने निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वीच भाजपतर्फे प्रविण पोटे यांनाच उमेदवारी मिळेल असे वृत्त प्रकाशित केले होते. आपली मातृभूमिने अलिकडच्या सर्वच अंकात प्रविण पोटे यांच्या उमेदवारीची दावेदारी नक्की झाल्याचे सांगितले होते. भाजपच्या अत्यंत विश्वसनिय सुत्राने प्रविण पोटे यांनाच उमेदवारी मिळेल अशी खात्री दिल्याचे यापूर्वीच आम्ही सार्वजनिकरीत्या सांगितले होतेे. त्यावर आज शिक्कामोर्तब झाले.




