केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा रविवारी दौरा

अमरावती/27 मे: केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचा रविवार, दि. 31 मे रोजी जिल्हा दौरा आहे. दौर्या नुसार, श्री.गडकरी दि. 31 मे रोजी दुपारी 1 वाजता अरुण अडसड यांच्या निवासस्थानी भेट देतील. त्यानंतर दुपारी 1.30 वाजता ’अभिनंदन अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड येथे भेट, दुपारी 2 वाजता महेंद्र राहटगावकर यांच्या निवासस्थानी भेट देऊन सायंकाळी5.30 वाजता ’द लाली इम्पेरियल’च्या कन्व्हेन्शन सेंटरचे उद्घाटन करतील. सायंकाळी 6 वाजता शारीरिक शिक्षण महाविद्यालयात श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांचा सत्कार समारंभ कार्यक्रमाला उपस्थित राहतील. त्यानंतर रात्री 8.15 वाजता अमरावतीहून नागपूरकडे प्रयाण करतील.




