बेजबाबदार विधाने करण्यापासून दूर रहा

शिवसेना पक्ष, चिन्हाविषयी डउ मध्ये सुनावणी

सुप्रिम कोर्टाचा ठाकरेंना इशारा

नवी दिल्ली/15 मे-सर्वोच्च न्यायालयात आज शिवसेना पक्ष व चिन्हाविषयी संक्षिप्त सुनावणी पार पडली. या सुनावणीत सरन्यायाधीशांनी या खटल्याच्या विलंबाविषयी ठाकरे गटाच्या नेत्यांकडून करण्यात येणार्‍या अनावश्यक विधानांवर तीव्र नाराजी व्यक्त केली. प्रस्तुत प्रकरण सूचिबद्ध केले जाते, तेव्हा तुम्ही तारीख द्या म्हणता आणि नंतर माध्यमांमध्ये जाऊन बेजबाबदार विधाने करता. हे आम्ही सहन करणार नाही. सर्वप्रथम तुम्ही तुमच्या लोकांना माध्यमांत जाऊन सर्वोच्च न्यायालय निर्णय घेत नाही अशी बेजबाबदार विधाने करण्यापासून रोखा, असे कोर्ट ठाकरे गटाच्या वकिलांना ठणकावण्याच्या सूरात म्हणाले. शिवसेना पक्ष व चिन्हाशी संबंधित याचिकांवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. या सुनावणीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वकील देवदत्त कामत यांनी या प्रकरणावर लवकर सुनावणी घेण्याची मागणी केली. त्यावर सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी देवदत्त कामत यांना चांगलेच खडेबोल सुनावले. सर्वप्रथम तुम्ही तुमच्या लोकांना माध्यमांमध्ये जाऊन सुप्रीम कोर्ट निर्णय घेत नाही अशी बेजबाबदार विधाने करण्यापासून रोखा. आम्ही दोन्ही पक्षांकडून सहकार्याची अपेक्षा करतो, असे ते म्हणाले.

संबंधित बातम्या

Back to top button