पंतप्रधान मोदी सोमनाथ अमृत महोत्सवात सहभागी
मंदिरात पूजा अन् 11 तीर्थक्षेत्रांतील पाण्याने केला कुंभाभिषेक

सोमनाथ/11 मे- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमनाथ मंदिरात आयोजित ‘अमृत महोत्सव’ कार्यक्रमात सहभाग घेतला. पंतप्रधान मोदींनी मंदिरात पूजा केली. भगवान शिवाच्या 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या सोमनाथ मंदिराच्या भव्य कळसाला देशभरातील 11 पवित्र तीर्थक्षेत्रांतील पाण्याने अभिषेक करण्यात आला.
या अभिषेक सोहळ्यासाठी एका विशेष कलशाचा वापर करण्यात आला. सोहळ्यादरम्यान, 11 तीर्थक्षेत्रांतील पवित्र पाणी मंदिराच्या 90 मीटर उंच कळसावर ओतण्यात आले. या विशेष कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी राहुल गांधी कितीही टीका करत असले तरी, देशातील नागरिक पंतप्रधानांच्या आवाहनाला नेहमीच सकारात्मक प्रतिसाद देतात. यावेळीही जनता देशहितासाठी सरकारच्या पाठीशी उभी राहील, असा विश्वासही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.




