भाच्याने केला आरोपीचा निर्घृण खून

प्रतिशोध : मामावर झालेल्या हल्ल्याचा बदला

अमरावती/10 मे: शहरातील अकोली रेल्वे स्टेशन परिसरात एका जुन्या वादातून रक्ताचा खेळ खेळला गेला. आपल्या मामावर कुर्‍हाडीने हल्ला करणार्‍या तरुणाचा, जखमी व्यक्तीच्या भाच्याने आपल्या विधी संघर्ष बालक मित्राला सोबत घेवून काटा काढला. रविवारी रात्री म्हाडा कॉलनीजवळील जंगलात ही थरारक घटना घडली.
नेमकी घटना काय?-मिळालेल्या माहितीनुसार, मृत राजू राजूरकर (26) आणि आरोपी आकाश जगन्नाथ खोरगडे याचे मामा यांच्यात 29 एप्रिल रोजी जोरदार वाद झाला होता. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि संता पलेल्या राजूने आका शच्या मामाच्या डोक्यावर कुर्‍हा डीने वार केले होते. या हल्ल्यानंतर मामा गंभीर जखमी झाले, तर राजू घटनास्थळावरून फरार झाला होता. याप्रकरणी 7 मे रोजी खोलापुरी गेट पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता.
असा रचला हत्येचा सापळा-रविवार, 10 मे रोजी राजू राजूरकर हा परिसरात परतल्याची माहिती आकाश जगन्नाथ खोरगडे (24) याला मिळाली. आपल्या मामावर झालेल्या हल्ल्याचा बदला घेण्याचे त्याने निश्चित केले. आकाशने एका अल्पवयीन मित्राच्या मदतीने राजूला गाठले आणि त्याला विश्वासात घेऊन दुचाकीवर बसवले. हे तिघेही सायंकाळी 7 च्या सुमारास म्हाडा कॉलनीजवळील निर्जन जंगलात गेले. तिथे आरोपींनी राजूला भरपूर दारू पाजली. राजू नशेत असतानाच आकाश आणि त्याच्या साथीदाराने त्याला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. मारहाण सुरू

संबंधित बातम्या

Back to top button