गाडगेनगर हल्ला प्रकरणातून दोन्ही आरोपींची मुक्तता

पुराव्याअभावी न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

साक्षीदार तपासणीत उघड; विसंगती ठरली निर्णायक

अमरावती/28 एप्रिल– गाडगेनगर पोलीस स्टेशन परिसरातील हल्ला प्रकरणात दीर्घ सुनावणीनंतर न्यायालयाने दोन्ही आरोपींना निर्दोष मुक्त केले. साक्षीदारांच्या जबाबातील विसंगती आणि ठोस पुराव्यांचा अभाव लक्षात घेऊन हा निर्णय देण्यात आला. या निकालामुळे प्रकरणाला महत्त्वपूर्ण वळण मिळाले असून आरोपींना मोठा दिलासा मिळाला आहे.
7 सप्टेंबर 2025 रोजी रात्री उशिरा विजय चायनीज दुकानाजवळ अमित उज्ज्वल मनोहर याच्यावर हल्ला झाल्याची तक्रार गाडगेनगर पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. या प्रकरणात भारत ऊर्फ मक्की अर्जुन घुगे व अभिषेक गोविंदराव जाधव यांच्यावर गंभीर मारहाणीचा आरोप ठेवण्यात आला होता. फिर्यादीच्या म्हणण्यानुसार लोखंडी धारदार शस्त्राने डोक्यावर वार करण्यात आले आणि हस्तक्षेप करताना हातावरही दुखापत झाली. प्रकरणाचा तपास पूर्ण झाल्यानंतर न्यायालयात खटला चालू झाला. एकूण पाच साक्षीदारांची सखोल तपासणी करण्यात आली. मात्र, साक्षीदारांच्या जबाबात अनेक विसंगती आढळून आल्या. बचाव पक्षाचे वकील अ‍ॅड. अनिल विश्वकर्मा यांनी प्रभावी युक्तिवाद सादर करत पुराव्यांतील त्रुटी अधोरेखित केल्या. सरकारी पक्षाने जखमा धारदार शस्त्रामुळे झाल्याचा दावा केला होता, परंतु त्या जखमा आरोपींनीच केल्याचे ठोसपणे सिद्ध झाले नाही. दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकून जिल्हा व सत्र न्यायालय क्रमांक 4 अमरावती यांनी 24 एप्रिल 2026 रोजी निकाल देत दोन्ही आरोपींना निर्दोष मुक्त केले. या खटल्यात अ‍ॅड. अनिल विश्वकर्मा यांना अ‍ॅड. मनोज नरवाडे, अ‍ॅड. नम्रता साहू, अ‍ॅड. ऋतुराज भोरे, अ‍ॅड. प्रतीक सगणे, अ‍ॅड. कार्तिक देशमुख, अ‍ॅड. आर्यन विश्वकर्मा व समृद्धी जाधव यांनी सहकार्य केले.
न्याय प्रक्रियेत सत्याला मिळतो नेहमीच विजय-ुपुराव्यांची ठोस मांडणी आणि साक्षीदारांची सुसंगतता न्यायप्रक्रियेत अत्यंत महत्त्वाची ठरते. या प्रकरणात विसंगती स्पष्ट झाल्याने आरोपींना दिलासा मिळाला. न्यायालयीन प्रक्रियेत संयम, सत्य आणि कायदेशीर लढा यांचा शेवटी विजय होतो, हे या निकालातून अधोरेखित झाले.

संबंधित बातम्या

Back to top button