अमरावतीत शिवरायांच्या अपमानावरून काँग्रेस आक्रमक
राजकमल चौकात जोरदार घोषणाबाजी

धीरेंद्र शास्त्री उर्फ बागेश्वरवर गुन्हा दाखल करण्याची मागणी
ढोंगी बाबाला महाराष्ट्रात कायमस्वरूपी बंदी घाला
अमरावती/26 एप्रिल- महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा जाहीर कार्यक्रमात अपमान करणार्या धीरेंद्र शास्त्री उर्फ बागेश्वर बाबाच्या विरोधात आज अमरावती शहर काँग्रेसने रणशिंग फुंकले. इतिहासाची मोडतोड करून महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणार्या या भोंदू बाबावर तातडीने गुन्हा दाखल करावा आणि त्याला महाराष्ट्रात येण्यास कायमची बंदी घालावी, या मागणीसाठी राजकमल चौकात आज प्रचंड निदर्शने करण्यात आली. प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या मार्गदर्शनात आणि शहराध्यक्ष बबलु शेखावत यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनाने संपूर्ण शहर दणाणून गेले होते. विशेष म्हणजे ज्या कार्यक्रमात महाराजांचा अपमान झाला, तिथे उपस्थित असूनही मौन बाळगणार्या भाजप नेत्यांचा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचाही यावेळी निषेध करण्यात आला. राजकमल चौकात जमलेल्या शेकडो शिवप्रेमी कार्यकर्त्यांनी बागेश्वर बाबा आणि त्याला पाठीशी घालणार्या सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ नाव नसून ती आमची अस्मिता आहे, त्यांच्याबद्दल चुकीचे बोलणे कोणताही महाराष्ट्रीय सहन करणार नाही, असा इशारा यावेळी देण्यात आला. या आंदोलनात माजी पालकमंत्री डॉ. सुनील देशमुख, शहराध्यक्ष बबलु शेखावत, मनपा विरोधी पक्षनेते विलास इंगोले, माजी महापौर मिलिंद चिमोटे, स्वीकृत नगरसेवक अनिल अग्रवाल यांनी सरकारवर कडाडून टीका केली. ज्या व्यासपीठावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि सरसंघचालक मोहन भागवत उपस्थित होते, तिथेच शिवरायांचा अवमान होत असताना या नेत्यांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली, ही बाब अत्यंत संतापजनक असल्याचे आंदोलकांनी सांगितले. यावेळी ’छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ’छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सन्मानार्थ काँग्रेस पक्ष मैदानात’, ’छत्रपतींचा अपमान देश सहन करणार नाही’, ’भोंदू बागेश्वरला संरक्षण देणार्या भाजप सरकारचा निषेध असो’ अशा मराठी घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. आंदोलनात महिला काँग्रेसच्या जयश्री वानखडे, नितीन काळे, निलेश गुहे, संकेत कुलट, विनोद मोदी, हाजी नजीर खान बी.के., नगरसेवक विक्की वानखडे, नगरसेविका अर्चना आत्राम, नगरसेविका सुनीता भेले, नगरसेविका राजश्री जढाळे, मैथिली पाटील, वंदना निरगुडे, किरण चांदवडकर, गुड्डू हमीद, सलीमभाई मिरावाले, अभिनंदन पेंढारी, भैय्यासाहेब निचळ, प्रदीप अरबट, दीपक हुंडीकर, विजय बर्वे, संजय शिरभाते, मनोज भेले, प्रभाकर वळसे, सुरेश रतावा, विजय वानखडे, संजय बोबडे, संदेश सिंघई, जितेंद्र वाघ, अनिल तायडे, गजानन रडके, श्याम खेरडे, अशोक डोंगरे, संजय बोबडे, प्रकाश पाहुरकर, प्रमोद इंगोले, विजय शिंदे, जितेश नाईक, अफजल चौधरी, डॉ. फिरोज, मोहम्मद शरीफ, संजय देशमुख, अनिकेत ढेंगळे, आकाश भगत, रणधीर कापसीकर, विजय केडिया, आकाश वळसे, राहुल सावळे, शंकर दिवटे, जुबेर खान, सूर्यकांत भलावी, एस.आर. धुर्वे, महेश लोंढे, जावेद भाई, अज्जू भाई ठेकेदार, कलीम शाह, अफजल पठाण, विजय खंडारे, सुरेश कनोजिया, चेतन याऊल, अब्दुल रऊफ, प्रमोद कुचे, विजय लंगोटे यांच्यासह युवक काँग्रेस, सेवादल, एन.एस.यू.आय., इंटक आणि विविध सेलचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शिवरायांचा अपमान करणार्या प्रवृत्तींना ठेचल्याशिवाय काँग्रेस गप्प बसणार नाही, असा ठाम निर्धार या प्रसंगी व्यक्त करण्यात आला.
शिवरायांचा सन्मान सर्वोच्च आहे -छत्रपती शिवाजी महाराज ही महाराष्ट्राची अस्मिता असून त्यांच्या विरोधात बोलणे म्हणजे आगीशी खेळण्यासारखे आहे. केवळ राजकीय फायद्यासाठी अशा भोंदू बाबांना पाठबळ देणार्या सत्ताधार्यांनी जनतेची माफी मागावी. शिवरायांचा अपमान करणार्यांवर कठोर कारवाई हीच खरी श्रद्धांजली ठरेल.




