पोलीस हादरले, हिंदुत्ववादी आक्रमक ‘पापाचा घडा’ भरला; राज्यात संतापाचा उद्रेक

अमरावती/13 एप्रिल– नाशिकच्या अशोक खरात प्रकरणाची शाई अद्याप वाळलीही नव्हती, तोच अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथे एका 19 वर्षीय युवकाचे सहा वेगवेगळ्या युवतींसोबतचे अश्लील (न्यूड) व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलीस प्रशासनाने तातडीने तपास सुरू केला असून संशयितांना कारवाईच्या कक्षेत आणले आहे.
या धक्कादायक प्रकारानंतर भाजप प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. हे प्रकरण ’लव्ह जिहाद’चे असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला असून, अमरावती ग्रामीण पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करून संबंधित आरोपीला अटक करावी, अशी मागणी केली आहे. अमरावती ग्रामीण पोलिसांनी तांत्रिक तपासाद्वारे व्हिडिओमध्ये दिसणार्या 19 वर्षीय युवकाची आणि हे व्हिडिओ टेलिग्रामवर व्हायरल करणार्या त्याच्या मित्राची ओळख पटवली आहे. हे दोन्ही आरोपी ’पापाचा घडा’ भरला; राज्यात संतापाचा उद्रेक-सध्या पोलिसांच्या निगराणीत असून, जर कोणी पीडिता किंवा तिच्या कुटुंबातील सदस्य तक्रार नोंदवण्यासाठी पुढे आले, तर त्यांना तातडीने अटक केली जाईल, असे संकेत मिळत आहेत. व्हिडिओमध्ये दिसणार्या युवती अल्पवयीन असण्याची शक्यता आहे. पीडितांनी किंवा त्यांच्या कुटुंबीयांनी न घाबरता पुढे येऊन तक्रार नोंदवावी; तक्रारदार आणि पीडितांची नावे पूर्णपणे गोपनीय ठेवली जातील, असे पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी सांगितले. व्हिडिओ व्हायरल करणारा युवक हा मुख्य आरोपीचा मित्र असल्याचे सांगितले जात आहे. राज्यसभा खासदार डॉ. अनिल बोंडे यांनीही पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांची भेट घेऊन या प्रकरणात कठोर कारवाईची मागणी केली आहे.




