हनुमान चालिसाच्या माध्यमातून हिंदूंना सक्षम करणार
डॉ.प्रवीण तोगडिया यांची घोषणा; ’हिंदू हेल्पलाईन’ची सुरुवात

अमरावती/13 एप्रिल– आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद आणि राष्ट्रीय बजरंग दलाचे अध्यक्ष डॉ. प्रवीण तोगडिया यांनी आज अमरावती दौर्यात आयोजित पत्रकार परिषदेत एक मोठी घोषणा केली. सामूहिक हनुमान चालिसा पठणाचा प्रघात वाढवून हिंदूंना संघटित करण्यासोबतच त्यांना निरोगी आणि समर्थ बनवण्यासाठी एक अनोखी मोहीम सुरू करण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले. या मोहिमेअंतर्गत हनुमान चालिसा केंद्रांचे ’हिंदू आरोग्य केंद्र’ (हिंदू वेलनेस सेंटर) मध्ये रूपांतर केले जाणार असून ’हिंदू हेल्पलाईन’ देखील सुरू केली जात आहे.
शहरातील ज्येष्ठ समाजसेवक चंद्रकुमार उर्फ लप्पी जाजोदिया यांच्या निवासस्थानी झालेल्या या परिषदेत डॉ. तोगडिया म्हणाले की, भारतातील सर्व गावांत आणि शहरांत दर मंगळवारी व शनिवारी सामूहिक हनुमान चालिसा पठणाचे आवाहन करण्यात आले आहे. अमरावती शहरात 101 हनुमान चालिसा पठण केंद्र स्थापन करण्याचे उद्दिष्ट आहे.
या केंद्रांमध्ये केवळ पठणच होणार नाही, तर सहभागी होणार्या भाविकांकडून ’मूठभर धान्य’ दान घेतले जाईल. हे धान्य स्थानिक पातळीवर गरजूंच्या मदतीसाठी वापरले जाईल. तसेच, या केंद्रांना वेलनेस सेंटरमध्ये बदलून लोकांना रोगमुक्त राहण्यासाठी 15 प्रकारच्या ’लाईफस्टाईल’चेप्रशिक्षण दिले जाईल. देशात सध्या पार्किन्सनचे 25 कोटी आणि मधुमेहाचे 40 कोटींहून अधिक रुग्ण आहेत, ज्यांना भविष्यात अर्धांगवायू (पॅरालिसिस) किंवा हृदयविकाराचा धोका आहे. अशा परिस्थितीत हिंदूंना वाचवण्यासाठी हे उपक्रम आवश्यक आहेत. डॉ. तोगडिया यांनी पुढे सांगितले की, समाजातील प्रत्येक घटकापर्यंत मदत पोहोचवण्यासाठी ’इंडिया हेल्पलाईन’ आणि ’हिंदू हेल्पलाईन’ (क्र. 020-66803300)




