भूमाफिया भाजप आ.नरेंद्र मेहतांच्या कारवाईचे खुद्द मोदींचे आदेश

मुंबई /17 मार्च – मिरा-भाईंदरचे भाजप आमदार यांच्या विरोधात स्थानिकांनी अनेक तक्रारी दिल्या, मात्र महसूल विभागाकडून त्याची दखल घेण्यात आली नाही, असा आरोप आहे. मेहतांनी आदिवासी आणि अन्य समाजाच्या व्यक्तींच्या जमिनीवर अवैध ताबा मिळवला, या जमिनी लाटल्या. त्यावरील कोट्यवधींची स्टँप ड्यूटी त्यांनी भरलेली नाही. यामुळे महाराष्ट्र सरकारचा 400-500 कोटी रुपयांचा महसूल बुडाल्याचा आरोप नरेंद्र मेहता यांच्यावर आहे.
नरेंद्र मेहता यांनी अवैध जमिनी बळकावल्या, महसूल बुडवला याची तक्रार महसूल मंत्री बावनकुळे यांच्याकडेही करण्यात आली. महसूल मंत्री बावनकुळे यांनी त्यांच्याविरोधातील चौकशीचे आदेश देणार्या सरकारी पत्रावर भाजप आमदाराचा उल्लेख ‘भूमाफिया’ असा केला. यामुळे राज्यात खळबळ उडाली आहे. काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी हे पत्र माध्यमांसमोर उघड केले. त्यानंतर बावनकुळे यांनी माध्यमांसमोर येऊन नरेंद्र मेहता यांची बाजू सावरण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून आले. महसूल विभागाकडे नरेंद्र मेहता यांच्याविरोधात अनेक तक्रारी आणि निवेदन दाखल झाले. या निवेदनावर महसूल विभागाने कव्हर लेटर लिहून त्यामध्ये ‘भूमाफिया नरेंद्र लालचंद मेहता यांच्या सेव्हन इलेव्हन कन्स्ट्रक्शन’ यांनी न भरलेले मुद्रांक शुल्क आणि दंडाच्या रकमेची पर्यायाने शासनाच्या थकित महसुलाची जलद वसुली करणे, असा उल्लेख करुन 7 दिवसांमध्ये चौकशी करण्याचे आदेश दिले. या पत्रावर बावनकुळेंची सही असल्याचा दावा नाना पटोले यांनी केला. बावनकुळेंनीही हे पत्र त्यांच्याकडून गेले असल्याचे मान्य केले आहे. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, नरेंद्र मेहता यांच्याविरोधात माझ्याकडे एक नाही तर 10-15 तक्रारी आल्या आहेत. त्याच्या त्यामध्ये कुठेही आमदार नरेंद्र मेहता लिहिलेले नव्हते.




