रोहित टिळक शिंदेच्या शिवसेनेत

पुणे/11 मार्च -पुण्यात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचे नेते रोहित टिळक यांनी काँग्रेसला सोड चिठ्ठी दिली आहे. लवकरच ते शिंदे गट शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टिळक पुरस्कार दिल्यामुळं काँग्रेसमध्ये रोहित टिळक यांच्याबाबत नाराजी होती. अखेर काँग्रेस नेते रोहित टिळक यांनी काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेतला.
पंतप्रधान नरेंद्र मोदींना टिळक स्मारक ट्रस्ट यांच्यातर्फे टिळक पुरस्कार देण्यात आला होता. त्यामुळं काँग्रेसमध्ये रोहित टिळक आणि टिळक कुटुंबीय यांच्या विरोधात कुरबुर सुरू झाली होती. याविरोधातील वातावरणामुळे आणि स्वतः विरुद्धच्या तक्रारींना त्रासून काँग्रेस नेते रोहित टिळक यांनी काँग्रेस पक्ष सोडण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे.




