सीए परीक्षेत, हरयाणाचा कन्हैयालाल देशात अव्वल

नवी दिल्ली– इंडियन इन्स्टिटयूट ऑफ चार्टर्ड अका ऊंटंट ऑफ इंडिया अर्थात आय सीए आयच्या वतीने घेण्यात येणार्‍या सीए इंटर परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. या परीक्षेत हरयाणाच्या कन्हैया लालने देशात पहिला क्रमांक पटकावला आहे. सीए इंटर परीक्षा जानेवारी 2026 मध्ये झाली होती. या परीक्षेतील सर्व विद्यार्थी संकेतस्थळावर जाऊन निकाल पाहू शकतात. संकेतस्थळावर गुणवत्ता यादीही देण्यात आली आहे. या परीक्षेत देशात अव्वल ठरलेला कन्हैया लाल हरयाणातील एलेनाबादचा राहणारा असून त्याने 600 पैकी 508 अंक मिळवले आहेत. त्याच्या गुणांची टक्केवारी 84.67 टक्के इतकी आहे.

संबंधित बातम्या

Back to top button