भारत आणि युरोपमध्ये ऐतिहासिक व्यापार करारांवर शिक्कामोर्तब

97% युरोपियन आयातीवरील शुल्क कमी होणार

कपडे, पादत्राणे, दागिने गाड्या स्वस्त होणार!

नवी दिल्ली/27 जानेवारी : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि युरोपियन युनियन (एण) आयोगाच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेयन आणि युरोपियन कौन्सिलचे अध्यक्ष अँटोनियो कोस्टा यांची दिल्लीतील हैदराबाद हाऊस येथे यांच्याशी बैठक झाली. 16 व्या भारत-एण शिखर परिषदेदरम्यान भारत आणि युरोपियन युनियनच्या नेत्यांनी भारत आणि युरोपियन युनियनमधील आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या मुक्त व्यापार करारावर (EU ) स्वाक्षरी करण्यात आली.
युरोपियन युनियन हा भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार आहे, 2023-24 मध्ये 135 अब्ज डॉलर्सच्या वस्तूंचा व्यापार झाला. ऋढ- मुळे भारत आणि एण सदस्य देशांमधील व्यापारात लक्षणीय वाढ होणार आहे. जवळजवळ नऊ वर्षांनी करारावर स्वाक्षरी झाल्या आहेत. जून 2022 मध्ये या करारावरील वाटाघाटी पुन्हा सुरू झाल्या होत्या. या करारामुळे 1.9 अब्जाहून अधिक ग्राहकांच्या बाजारपेठेत प्रवेश मिळणार आहे. कापड, चामडे, रसायने, इलेक्ट्रॉनिक्स आणि दागिने यासारख्या क्षेत्रांनाही या व्यापार कराराचा फायदा होण्याची अपेक्षा आहे. कारण ते युरोपियन उत्पादकांशी स्पर्धा करत नाहीत. भारतीय निर्यातदारांना सध्या बांगलादेशसारख्या विकसनशील देशांकडून होणार्‍या शुल्कमुक्त आणि कोटामुक्त निर्यातीमुळे तीव्र स्पर्धेचा सामना करावा लागतोय. भारतीयांसाठी काय स्वस्त होईल?-96.6% युरोपियन निर्यातीवरील शुल्क काढून टाकले जाईल किंवा कमी केले जाईल, ज्यामुळे दरवर्षी युरोपियन उत्पादनांवरील 4 अब्ज युरो पर्यंत शुल्क बचत होणार आहे. या व्यापार करारामुळे युरोपियन कारवरील कर 110 टक्क्यांवरून कमी होत फक्त 10 टक्के होतील. तर वाइनवरील कर 150 टक्क्यांऐवजी 20 टक्के कमी होतील. कारवरील कर हळूहळू 110% वरून 10टक्के पर्यंत कमी केला जाणार आहे. ज्यामुळे ऑडी, मर्सिडीज-बेंझ आणि बीएमडब्ल्यू सारख्या युरोपियन कंपन्यांचे हाय-एंड किंवा स्पेशल मॉडेल्स भारतीय बाजारात स्वस्त होणार आहेत. यामुळे भारत आणि युरोपदरम्यान पुरवठा साखळी वाढलेल. यामुळे दोन्ही देशातील उद्योग अजून एकमेकांशी जोडले जातील.युरोप हा भारतातील ऑटो कंपोनेटसाठी मोठी बाजारपेठ आहे. यामुळे या करारामुळे भारतीय कंपन्यांना मोठा फायदा होईल. युरोपमध्ये बनवल्या जाणार्‍या सुटे भागांच्या किमती जास्त असल्याने, भारताच्या देशांतर्गत उत्पादन उद्योगावर होणारा परिणाम हा मर्यादित राहील अशी अपेक्षा आहे.

संबंधित बातम्या

Back to top button