इम्तियाज जलील यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न

कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; ओवेसींच्या सभेआधी गोंधळ

छत्रपती संभाजीनगर/7 जानेवारी – छत्रपती संभाजीनगरमधील बायजीपूरमध्ये एमआयएमचे कार्यकर्ते आणि एमआयएममधील नाराज असलेल्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली आहे. एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील हे त्या भागातून पदयात्रा काढत होते त्याचवेळी हा हल्ला झाला. पदयात्रा सुरू झाल्यापासूनच इम्तियाज जलील यांना विरोध होत होता. त्यांच्या सोबतच हा राडा घडला आहे. एमआयएमच्या नाराज गटाने इम्तियाज जलील यांना यावेळी काळे झेंडे दाखवण्यात आले. एमआयएमच्या जुन्या कार्यकर्त्यांना तिकीट वाटपात डावलण्यात आल्याचा आरोप नासिर सिद्दीकी यांच्यासह 20-22 उमेदवारांनी केला. आमची एमआयएमवर निष्ठा कायम आहे, मात्र इम्तियाज जलील यांना या निवडणुकीपासून दूर करण्यात आले पाहिजे.

संबंधित बातम्या

Back to top button