भाजपचे नाराज कार्यकर्ते बच्चू कडूंच्या संपर्कात

तिकीट न मिळाल्याने असंतोषाची लाट

* मनपाच्या निवडणुकीत राजकीय चर्चेला उधान

अमरावती /1 जानेवारी : महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये उमेदवारांच्या नाराजीची लाट उफाळून येत आहे. पक्षातून निवडणूक टिकट न मिळाल्याने अनेक नेते व समर्थक असंतुष्ट झाले असून, ते आपली नाराजी व्यक्त करण्यासाठी योग्य माध्यम शोधत आहेत. शहरातील राजकीय चर्चेचा केंद्रबिंदू आता या नाराजीवर केंद्रीत झाला आहे.
गेल्या काही दिवसांपासून पक्षाच्या उमेदवार निवडीवर प्रश्न निर्माण होत असल्याचे दिसत आहे. टिकट न मिळाल्याने नाराज उमेदवार संगम गुप्ता यांनी गतव्या दिवशी प्रदेश प्रवक्ता शिवराय कुलकर्णी व जयंत डेहनकर यांना घेराव करून जोरदार प्रश्न उभे केले होते. या प्रसंगामुळे शहरातील राजकीय वातावरण तणावपूर्ण झाले आणि पक्षाच्या अंतर्गत सुसंवादावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले.
याच पार्श्वभूमीवर, शक्ती महाराज आणि त्यांचे समर्थक आज दुपारी माजी मंत्री बच्चू कडूसोबत भेटले. बैठकीत त्यांनी पक्षाच्या निर्णयाविरुद्ध आपली नाराजी स्पष्ट केली, उमेदवार निवडीच्या प्रक्रियेवर संताप व्यक्त केला आणि आगामी रणनीतीवर चर्चा केली. राजकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, या भेटीमुळे महानगरपालिकेच्या निवड णुकीच्या गदारोळात अधिक गती येण्याची शक्यता आहे.
शक्ती महाराज व समर्थकांची ही बैठक ही फक्त नाराजी व्यक्त करण्यापुरती मर्यादित नाही, तर भविष्यातील पक्षातील राजकीय हालचाली, उमेदवारांच्या पद्धती आणि निवडणूक रणनीतीवर परिणाम करु शकते असा अंदाज आहे. नगरपालिकेत उमेदवारांमधील असंतोषाचे हे पहिलेच संकेत असल्याचे राजकीय पर्यवेक्षक नोंदवतात.
राजकीय विश्लेषकांचे मत आहे की, ही घटना शहरातील निवडणूक प्रक्रियेवर तणाव निर्माण करण्यास कारणीभूत ठरू शकते. शहरात या भेटीची चर्चा जोरात सुरू झाली असून, पक्षाच्या निर्णयामुळे राजकीय रंगत वाढण्याची, संभाव्य आंदोलन किंवा घोषणांद्वारे दबाव निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.भाजपच्या राजकीय कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे की, ही नाराजी फक्त एका घटकापुरती मर्यादित नाही, तर अनेक उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांमध्ये असंतोषाची लाट आहे. त्यामुळे नगरपालिकेच्या निवडणुकीत पक्षाच्या एकसंधतेवर प्रश्न निर्माण होऊ शकतो. शहरातील सामान्य नागरिकांमध्येही निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय चर्चा उबदार झाली आहे. उमेदवार निवडीच्या प्रक्रियेमुळे पक्षाच्या धोरणांवर, आगामी निवडणूक रणनीतीवर आणि संभाव्य मतांची वाटणीवर परिणाम होण्याची शक्यता आहे.राजकीय तज्ज्ञ म्हणतात की, या भेटीमुळे शहरातील निवडणुकीच्या रंगात नवी उर्जा येईल, तसेच पक्षाच्या आतल्या असंतोषाचे स्वरूप बाहेर येईल. नगरपालिकेतील राजकीय हालचाली आणि उमेदवारांच्या निर्णय प्रक्रियेत येणार्‍या बदलांवर लक्ष ठेवणे आवश्यक आहे, कारण या घटनांमुळे निवडणुकीच्या निकालावर प्रत्यक्ष प्रभाव पडू शकतो.

…तर शिक्षणमंत्र्यांच्या घरात कुत्रे सोडू

शाळेतील भटक्या कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी शिक्षकांवर जबाबदारी टाकण्याच्या निर्णयावर बच्चू कडू आक्रमक झाले आहेत. निर्णय मागे घेतला नाही तर शिक्षणमंत्र्यांच्या घरात कुत्रे सोडण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. शाळेच्या आवारातील भटक्या कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी शिक्षकांवर नोडल अधिकारी म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. अमरावती महानगर पालिकेच्या शिक्षण विभागाने हा अजब फतवा काढला आहे. त्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. यावर प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू चांगलेच आक्रमक झाले असून बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्र्यांना खडेबोल सुनावले आहे. हा निर्णय तात्काळ मागे घ्यावा अन्यथा शिक्षणमंत्र्याच्या घरात कुत्रे सोडू असा इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे. शिक्षकाने कुत्र्याला सांभाळायचं आणि शिक्षकांनी किती कुत्रे सांभाळले हा पाठपुरावा आमदार करेल त्याचा पाठपुरावा देवा भाऊ करेल असे दिवस महाराष्ट्रात आले याचा आम्ही निषेध करतो. हा निर्णय वापस घेतला नाही तर शिक्षणमंत्र्याच्या घरात कुत्रे सोडू असा इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे.

संबंधित बातम्या

Back to top button