जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट,16 जण भाजले
फटाक्याच्या आतिषबाजीने भडका

* घटनेत दोन विजयी नगरसेवकही होरपळले
पुणे /21 डिसेंबर : जेजुरी नगरपरिषद निकालाच्या उत्साहाला गालबोट लागल्याची घटना घडली. विजयाचा भंडारा उधळल्यानंतर आगीचा मोठा भडका उडाल्याचं दिसून आलं. या घटनेत 16 जण भाजले असून काही नगरसेवकांचाही त्यामध्ये समावेश आहे. जेजुरी गडाच्या पायथ्याशी फटाके फुटत असताना भंडारा उधळल्यानंतर आगीचा भडका उडाला. भेसळयुक्त भंडार्यामुळे आगीचा भडका उडाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. राज्यातील नगरपालिका, नगरपरिषदांचा निकाल आज जाहीर झाला. जेजुरी नगरपरिषदेवर सत्तांतर होऊन अजितदादांच्या राष्ट्रवादीने बाजी मारली. त्यानंतर विजयी उमेदवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष सुरू केला. जेजुरीत मतमोजणी पार पडून निकाल जाहीर झाल्यानंतर गडाच्या पहिल्या पायरीजवळ खंडेरायाचरणी भंडारा अर्पण करून आशीर्वाद घेताना फटाके वाजत होते. सोबतच भंडार्याची उधळणही होत होती होते. त्यामुळे भंडारा उधळल्यानंतर आगीचा भडका उडाला आणि त्यामध्ये 169 जण भाजले गेले. जमखींमध्ये नुकतेच निवडून आलेल्या काही नगरसेवकांचा समावेश आहे. ही घटना रविवारी दुपारी घडली असून त्यामध्ये भाजले गेलेल्यांना जवळच्या खासगी आणि सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा भेसळयुक्त भंडार्याचा प्रश्न जेजुरीमध्ये ऐरणीवर आला आहे. माजी आमदार संजय जगताप यांची जेजुरीमधील सत्ता खालसा करण्यात अजित पवारांना यश आलं आहे. अजितदादांच्या राष्ट्रवादीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार जयदीप बारभाई मोठ्या फराकानं विजयी विजयी झाले आहेत. राष्ट्रवादीची 17 नगरसेवक निवडून आले आहेत. भाजपनं नगरसेवकाच्या सगळ्या जागा लढवल्या, फक्त दोन ठिकाणी यश मिळालं. तर एका जागेवर अपक्ष निवडून आला.




