धनंजय मुंडेंनी घेतली अमित शहांची भेट

नवी दिल्ली/17 डिसेंबर  – राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी बुधवारी दिल्लीवारी केली. यावेळी त्यांनी एनडीएच्या अनेक नेत्यांची भेट घेतली. ते सकाळी 11 वाजता संसद भवनात गेले. यावेळी त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली.
या दोन्ही नेत्यांमध्ये काय चर्चा झाली? याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही. पण, कोकाटेंचे मंत्रिपद धोक्यात आले असताना धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदासाठी भेट घेतली का? असा सवाल आता विचारला जात आहे. अद्याप, याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी देखील अद्याप काही माहिती दिलेली नाही. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे हे दिल्लीत आहेत. त्यामुळे धनंजय मुंडे यांचा दिल्ली दौरा महत्वाचा मानला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांना याबाबत विचारले असताना ते म्हणाले की, धनंजय मुंडे हे दिल्लीत का आले? हे मला माहिती नाही. काही व्यक्तिगत कारणासाठी ते दिल्लीत येऊन अमित शहांना भेटू  शकतात. कारण, त्यांचे वरिष्ठ हे मुंबईत असून ते दिल्लीत का आले? माझ्याकडे याबाबत काही माहिती नाही.

संबंधित बातम्या

Back to top button