नेहरूंनी ‘वंदे मातरम’लाच विरोध केला
पंतप्रधान मोदींची काँग्रेसवर घणाघाती टीका

* मुस्लिम लीगसमोर झुकल्याचा आरोप
नवी दिल्ली /8 डिसेंबर – जिनांचा विरोध धुडकावण्याऐवजी नेहरू यांनी ’वंदे मातरम्’लाच विरोध केला. नेहरूंनी मुस्लीम लीगसमोर गुडघे टेकले, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत केला. ’वंदे मातरम्’ या गीताला 150 वर्षे पूर्ण झाली, त्यानिमित्ताने संसदेत चर्चा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत होते. त्यांनी काँग्रेसवर घणाघाती टीका केली.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, गेल्या शतकात ’वंदे मातरम्’चा विश्वासघात झाला. ते वादात ओढले गेले. मुस्लिम लीगने ’वंदे मातरम्’ला विरोध केला. 1937 मध्ये जिना यांनी त्याला विरोध केला. नेहरूंनी मुस्लिम लीगचा निषेध केला नाही. जिना यांच्या विरोधानंतर नेहरूंना आपली खर्ची धोक्यात असल्याचे वाटले. जिना यांच्या विरोधानंतर नेहरूंना भीती वाटली. मुस्लिमांनी वंदे मातरमच्या काही शब्दांवर आक्षेप घेतला. काँग्रेसने त्याचे पुनरावलोकन करण्याची चर्चा केली. काँग्रेसने ’वंदे मातरम्’चे तुकडे केले. काँग्रेसने मुस्लिम लीगच्या दबावाखाली हा निर्णय घेतला, असा आरोप मोदींनी केला.नेहरूंनी सुभाषचंद्र बोस यांना लिहिलेल्या पत्रात याचा उल्लेख असल्याचा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. ’वंदे मातरम’ गीताने आणीबाणीलाही पराभूत केले. मुस्लीम लीगकडून ’वंदे मातरम्’ला कडाडून विरोध केला. काँग्रेसची स्थिती पहिल्यासारखीच आहे. काँग्रेसला देशाच्या फाळणीसमोर झुकावे लागले. खछउ चे चछउ झालेय, असा टोला मोदींनी लगावला.




