आजपासून नागपुर हिवाळी अधिवेशन गाजणार

लोककल्याणकारी योजनांसाठी निधी कमी पडू देणार नाही

* अधिवेशनाच्या पुर्वसंध्येला मुख्यमंत्री फडणविस यांची ग्वाही

नागपूर /7 डिसेंबर – मराठवाडा आणि विदर्भातील सर्वच महत्वाच्या विषयावर चर्चा करण्यासाठी शासन तयार आहे. राज्यात सद्यस्थितीत राबविण्यात येत असलेल्या लोककल्याणकारी योजनेसाठी निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी हिवाळी अधिवेशनाच्या पुर्वसंध्येला रामगिरी या शासकीय निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. महाराष्ट्राची अर्थव्यवस्था देशातील मोठ्या राज्यामध्ये सर्व निकषानंतर अग्रेसर असणारी अर्थव्यवस्था आहे. राज्यात अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त झालेल्या सुमारे 92 टक्के अर्थात 90 लाखाहून अधिक शेतकर्यांना आर्थिक मदत देण्यात आली आहे. अतिरीक्त 10 हजाराची मदत तसेच खरडून गेलेल्या जमिनी, विहीरी आदींसाठी स्वतंत्र मदत दिल्याची माहिती फडणविस यांनी यावेळी दिली. शासनाने लोकाभिमूख आणि कल्याणकारी निर्णय घेतल्यामुळे अधिवेशनात विदर्भ आणि मराठवाड्याच्या प्रश्नावर प्राधान्याने चर्चा करण्यात येणार असून नागरिकांचे प्रश्न सोडविणे हाच शासनाचा अजेंडा आहे असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले. विदर्भात अधिवेशन होत असल्याने येथील प्रश्नावर चर्चा करुन न्याय देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. जीडीपी, स्टार्टअप, विदेशी गुंतवणूक आदीमध्ये महाराष्ट्र अग्रेसर असल्याचे सांगून देशात सर्वात जास्त पायाभूत सुविधांचे प्रकल्प महाराष्ट्रात सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची अर्थव्यवस्था पाच ट्रीलीयन डॉलर करण्याचे उद्दीष्ट ठेवले आहे असे याप्रसंगी सांगितले.

 

संबंधित बातम्या

Back to top button