मंदिरातील पैसा हा देवतांचाच

नागपूर : भारताच्या विविध मंदिरांमध्ये ह जारो कोटी रुपये असल्याचा दावा केला जातो. मंदिरां मध्ये असलेल्या या पैशांबाबत देशात विविध गटांचे वेगवेगळे विचार आहेत. मंदिरातील पैशांचा वापर कुणी देशातील गरीबांसाठी करण्याचा सल्ला देतो तर कुणी या पैशांचा वापर विकास कार्यासाठी करण्याचे मत व्यक्त करतो. दुसरीकडे, हा पैसा मंदिरांची संपत्ती असल्याचा दावा करणारा गटही अस्तित्वात आहे. अलिकडेच सर्वोच्च न्यायालयात मंदिरातील पैशांबाबत दाखल एका याचिकेवर सुनावणी झाली. याचिकेवर सुनावणीदरम्यान सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी महत्वपूर्ण विधान केले.




