सदानंद दाते राज्याचे नवे पोलिस महासंचालक होणार

मुंबई – महाराष्ट्र सरकारने वरिष्ठ पोलिस अधिकार्यांना मोठा जबा बदारीचा टप्पा दिला असून, 1990 बॅचचे खझड अधिकारी सदानंद दाते यांची राज्याचे पोलीस महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सध्याच्या महासंचालक रश्मी शुक्ला यांचा 31 डिसेंबर 2025 रोजी निवृत्ती होत असल्याने, पुढील कार्यकाळासाठी दाते यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या कार्यकाळाची शेवटची मुदत डिसेंबर 2027 अशी ठेवण्यात आली आहे.दाते हे त्यांच्या कडक शिस्तीचे व कर्तव्यनिष्ठ वृत्तीमुळे ओळखले जातात. त्यांच्या कारकीर्दीत त्यांनी आर्थिक गुन्हे विभाग, सायबर क्राईम, रेल्वे पोलीस, तसेच एसपी नवी मुंबई या जबाबदार्या पेलल्या आहेत. सध्या ते राष्ट्रीय तपास संस्था चे महासंचालक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली ब्लॅक कॅट कमांडो युनिटने अनेक यशस्वी ऑपरेशन्स पूर्ण केले आहेत,




