सलीम-जावेदच्या कहाण्या थांबवा
मुख्यमंत्री फडणवीसांची राऊत-पवारांवर टीका

नागपूर /10 ऑगस्ट : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी एक गौप्यस्फोट केला. महाराष्ट्रातील 2024 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी दिल्लीत दोन लोक आपल्याला भेटायलाआले होते. या लोकांनी आपल्याला 160 जागा जिंकवून देण्याची खात्री दिली होती. शरद पवारांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत म्हणाले की, मी त्याही पुढे सांगतो, अशाच काही व्यक्ती लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीवेळी उद्धव ठाकरे यांनाही भेटल्या. तेव्हा उद्धव ठाकरे यांनी त्यांना स्पष्ट सांगितलं की, आमचा लाके शाहीवर विेशास आह.े त्यावर आता मख्ु यमत्रं ी दवे द्रें फडणवीसानं ी शरद पवार आणि सजं य राऊत याच्ं यावर पलटवार केला आहे . मख्ु यमत्रं ी देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ही सलीम जावेदची गोष्ट सुरु आहे. तुम्ही जबाबदार नागरिक आहात. अशा प्रकारे तुमच्याकडे कोणी आलं तर तुम्ही पोलीस तक्रार का केली नाही? निवडणूक आयोगाला तक्रार का केली नाही? तुम्ही वापर करण्याचा प्रयत्न करून बघितला का? त्यामुळे मला वाटतं या सलीम-जावेदच्या गोष्टी बंद केल्या पाहिजेत, असे म्हणत त्यांनी शरद पवार आणि संजय राऊत यांच्या विधानावर भाष्य केले आहे. तसेच ते पुढे म्हणाले की, आता हे गंभीर होत चालले आहे की, हे सगळे मिळून अशा प्रकारची कॉन्स्परंसी तयार करत आहे. माझी अपेक्षा होती की, हे देशातील मोठे नेते आहेत. कोणी फसवणुकीचा प्रयत्न करत असेल तर तुम्ही पोलिसांना कळवायला हवे. या सगळ्या गोष्टी थोतांड आहेत. असे म्हणत त्यांनी टीका केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, निवडणूक आयोगाने ईव्हीएम मशीन हॅक करण्याचे 4 वेळा सर्व राजकीय पक्ष आणि हॅकर्स यांना ओपन चॅलेंज दिले. पण, अजूनपर्यंत कोणीही ईव्हीएम हॅक करू शकले नाही. आता महाराष्ट्राच्या निवडणुकीवर इकडे-तिकडे बोलत आहेत. पण, निवडणूक आयोगाला समोर जायला तयार नाही. निवडणूक आयोग त्यांना पत्र देत आहे, नोटीस देत आहे, जाहीर निमंत्रण देत आहे. तिथे हे बोलत नाहीत. कारण मी यापूर्वी सांगितले की, शूट ऍंड स्कूट गोळा डागा आणि पळून जा ही रणनीती यांची आहे, असा हल्लाबोल त्यांनी केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांनी केलेल्या विधानावर भाष्य करताना, शरद पवार ते इतक्या दिवसांनी का बोलत आहेत? असा सवाल उपस्थित केला. राहुल गांधींना भेटल्यावरच याबाबतची त्यांना आठवण का आली? इतक्या दिवसानंतर ते आजच अचानक का बोलले? राहुल गांधी ज्या प्रकारे सलीम-जावेदच्या कहाण्या तयार करून त्यांच्या स्क्रिप्टवर रोज नवीन कपोकल्पित कहाण्या सांगतात तशी अवस्था शरद पवारांची तर झाली नाही ना? असे म्हणत टीका केली.




