तर पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांना उडवून देऊ

काँग्रेसचे खा.डॉ.प्रशांत पडोळे यांचा इशारा

भंडारा /4 नोव्हेंबर : केंद्र आणि राज्य सरकारने शेतकर्‍यांबाबत असलेले धोरण बदलावे आणि हेक्टरी एक लाख रुपयांची मदत करावी, नाहीतर तुम्हाला उडवून देऊ असा धमकीवजा इशारा गोंदियाचे काँग्रेस खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांनी दिला. पडोळे यांनी हा इशारा देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही नाव घेतले.
त्यावरून आता वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीस, यापुढे शेतकरी आत्महत्या करणार नाही, तर आम्ही तुम्हाला उडवून देऊ असा इशारा प्रशांत पडोळे यांनी दिला. विशेष म्हणजे राज्यातील सर्व विरोधक शेतकर्‍यांसाठी 50 हजार रुपये हेक्टुरी मदत मागत असताना प्रशांत पडोळे यांनी त्याच्यापेक्षा दुप्पट, म्हणजेच एक लाख रुपये हेक्टरी मदतीची मागणी केली.खासदार प्रशांत पडोळे म्हणाले की, शेतकरी विषयक धोरण केंद्र आणि राज्य सरकारने तातडीने बदलावे. नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना एक लाख रुपये हेक्टरी आर्थिक मदत द्यावी. भंडारा आणि गोंदिया जिल्ह्याला परतीच्या पावसानं अक्षरश: झोडपून काढल्यानंतर धान पिकाचं मोठं नुकसान झालं आहे. शेतातील धानाला कोंब फुटलेली आहेत. सरकारनं धोरण बदलायला पाहिजे. शेतकर्‍यांना पीक विम्याचे फक्त 18 रुपये मिळतात, ही शोकांतिका आहे. त्यामुळं शेतकरी विषयक धोरण बदलली पाहिजे. काँग्रेसचे खासदार पडोळे यांनी दिलेल्या या धमकीमुळे आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

संबंधित बातम्या

Back to top button