उद्या निवडणुका लागल्या तरीही आमची तयारी पक्की

महायुती घेणार 51% मते; ना.चंद्रशेखर बावनकुळेंचा विेशास

नागपूर/4 ऑगस्ट : राज्यात आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेध सर्वच राजकीय पक्षांना लागले आहेत. यासाठी विजयाची रणनीती आखण्यासाठी सुरुवात झाली आहे. येणार्‍या निवडणूकीत मुंबई महापालिकेवर काहीही करुन आपली सत्ता येण्यासाठी भाजपने तयारी सुरू केली आहे. तसेच, महापालिका आपल्या ताब्यातून जाऊ न देण्याचा प्रयत्न शिवसेना ठाकरे गटाडून केला जात आहे. शिवसेना ठाकरे गट आणि मनसे यांच्या युतीच्या चर्चांना देखील वेग आला आहे. भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे बोलताना म्हणाले की भाजप महायुतीने 51 टक्के मतदानाची तयारी केली आहे. विधानसभेत सुद्धा आम्हाला 51.78 टक्के मतं मिळाली आहेत. राज ठाकर े आणि त्याच्ं या मित्र पक्षानं ी काय तयारी केली ती मला माहिती नाही. पण, आमची तयारी झाली आहे .कोणीही आलं आणि लढलं तरीही 51% मत महायुती घेणार आहे, असा प्रबळ दावा भाजप नेते आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे केला आहे. तसेच पुढे ते म्हणाले की येणार्‍या निवडणुकीत एकही जागा काँग्रेस, शरद पवार किंवा ठाकरे यांच्या पक्षाला मिळणार नाही. कारण जनतेने स्वीकारला आहे की, नरेंद्र मोदी हे देशाला समृद्ध करत आहेत. तर देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राला विकसित करत आहेत. त्यामुळे, जनता विकासासोबत जाणार आहे, असा विेशास स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबतीत बावनकुळे यांनी व्यक्त केला आहे.ठाकरे बंधुंच्या युतीसंदर्भात प्रश्न विचारला असता चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी आता त्यांच्या पक्षात जे उरले सुरले कार्यकर्ते आहे ते पाच वर्षे सांभाळायचे आहे. त्यामुळे त्यांना आता हे, बदलणार आहे ते बदलणार आहे ,असे बोलावं लागत आहे. मतदार यादी चुकलेली, बोगस मतदान असे विषय घेऊन उद्धव ठाकरे बोलत असतात.निघून गेलेल्या कार्यकर्त्यांना थांबवण्यासाठी उद्धव ठाकरे, असे बोलतात, असेही बावनकुळे म्हणालेज्यांची निवडणूक लढविण्याची तयारी नाही, ते लोक असे विधान करतात. आम्ही उद्या निवडणुका लागल्या तरीही तयार आहोत. महाराष्ट्रात 1 कोटी 51 लाख सदस्य असणारा भाजप, अजित पवार आणि एकनाथ शिंदे तयार आहेत. ते काय करणार हे माहित नाही, मात्र आमची तयारी पक्की आहे असेही बावनकुळे म्हणाले.                                                    *‘ते’ वक्तव्य नोटंकीबाज आंदोलन करणार्‍याबाबत                                                                                                      अनके पश्चिम महाराष्ट्राचे नेते नोटंकी करीत आहे हे माझे वक्तव्य ते बच्चू कडूसाठी नव्हते तर महाराष्ट्रात होत असलेल्या नोटंकीबाज आंदोलन करणार्‍याबाबत होते, असा खुलासा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. ते नागपुरात माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते. अमरावती मध्ये भाषण करताना बच्चू कडू यांच नाव घेतले नाही, उलट बच्चू कडू यांनी सांगितलेल्या बैठका आम्ही घेतल्या, दिव्यांग बांधवांचे महिन्याचे मानध वाढवले आहे. गरीब माणसाचे कर्ज माफ झाले पाहिजे, त्यासाठी समिती गठीत केली आहे, आठ दिवसानंतर त्यासंदर्भात बैठक घेणार आहे असेही बावनकुळे म्हणाले.

संबंधित बातम्या

Back to top button