आणिबाणीच्या काळातील दस्तावेज उपलब्ध नाहीत

नागपूर : देशातील आणिबाणीचा काळ हा भारतीय लोक शाहीतील सर्वात संघर्षमय आणि निर्णायक टप्पा मानला जातो. मात्र या कालखंडाचे दस्तावेजीकरण अत्यल्प असल्याबद्दल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी खंत व्यक्त केली. माझ्या दोन्ही मुलांना इमर्जन्सीबद्दल माहिती नाही; कारण त्या काळाविषयी आमच्याकडे कोणत्याही नोंदी उपलब्ध नाहीत, असे सांगताना त्यांनी त्या कालखंडातील आपल्या स्वानुभवांची उजळणी केली आणि लोकशाही वाचविण्यासाठी केलेल्या संघर्षाची जाणीव उपस्थितांना करून दिली.रेशीमबाग मैदानावर आयोजित नागपूर पुस्तक महोत्सव-2025च्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाला उच्च व तांत्रिक शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, एनबीटी इंडिया अध्यक्ष प्रा. मिलिंद मराठे, प्रसिद्ध लेखक अमिश त्रिपाठी, तसेच झिरो माईल यूथ फाउंडेशनचे अध्यक्ष अजय संचेती उपस्थित होते. गडकरी पुढे म्हणाले, त्या काळात जे काही घडत होते, त्याची नोंद ठेवण्याची आपल्या समाजात परंपरा नव्हती.

संबंधित बातम्या

Back to top button