बसवराजू आणि दोन मोठ्या कमांडरसह 26 नक्षलवादी ठार

एक जवान शहीद तर एक जखमी

*छत्तीसगढच्या नारायणपूरमध्ये चकमक, सुरक्षा दलांची मोहिम तीव्र

गडचिरोली / 21 मे: नक्षलवादा विरोधातील आपली मोहीम अधिक तीव्र करत सुरक्षा दलांनी बुधवारी सकाळपासून नारायणपूर येथे नक्षलवाद्यांविरोधात मोठी आघाडी उघडली आहे. डीआरजी (डिस्ट्रीक्ट रिझर्व्ह गार्ड) आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन मोठ्या कमांडरसह 26 नक्षलवादी मारले गेले.
नारायणपूर येथील अबूझमाड येथील जंगलात जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये सकाळपासून ही चकमक सुरू झाली. छत्तीसगड मधील नारायणपूर येथे डीआरजी जवानांनी नक्षलवाद्यांविरोधात जोरदार कारवाईस सुरुवात केली. अबूझमाड येथील जंगलात सुरक्षादलाने नक्षलवाद्यांच्या बड्या कमांडर्सना घेरले. जवळपास 26 नक्षलवाद्यांना ठार करण्यात आले आहे. नारायणपूर, दंतेवाडा, बिजापूर आणि कोंडागाव येथील जवान देखील घटनास्थळी होते. मिळालेल्या माहितीनुसार, अबूझमाड येथील जंगलात सकाळपासून ही चकमक सुरू झाली. नक्षलवाद्यांचे प्रमुख कमांडर येथे असण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास सुरक्षा जवानांना मोठेच यश मिळेल. उपमुख्यमंत्री विजय शर्मा यांनी या ऑपरेशनबद्दल सुरक्षा दलाच्या जवानांचे अभिनंदन केले आहे. तसेच या चकमकीत 26 नक्षलवादी मारले गेल्याच्या माहितीला दुजोरा दिला आहे. या चकमकीत एक जवान जखमी तर एक हुतात्मा झाला आहे. अजूनही सर्च ऑपरेशन सुरू असल्याचे शर्मा म्हणाले. अबूझमाड मधील बोटेर येथे नक्षलवाद्यांच्या पोलिट ब्युरोचे सदस्य तसेच नक्षलवादी संघटनेचे महासचिव बसवा राजू उपस्थित असल्याची खबर पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर दंतेवाडा, बिजापूर, नारायणपूर आणि कोंडागाव येथील डीआरजी जवानांना तेथून हलवण्यात आले. तर दुसरीकडे अबूझमाड येथे सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमकीस सुरुवात झाली. भारत नक्षलवाद मुक्त करण्याचे ध्येय साध्य करण्यासाठी सुरक्षा दल कसून कामाला लागले आहेत. छत्तीसगडमध्ये तर नक्षलवाद्यांविरोधात सातत्याने मोहीम राबवली जात आहे. पोलिसांनी 7 दिवस आधीच एका पत्रकार परिषदेत कर्रेगुट्टा ऑपरेशनची माहिती दिली होती. छत्तीसगड-तेलंगणा सीमेवरील कर्रेगुट्टाच्या डोंगराळ भागात 24 दिवस सुरू असलेल्या या ऑपरेशनमध्ये 31 नक्षलवाद्यांना यमसदनी धाडले. यात 16 महिला आणि 15 पुरुषांचा समावेश आहे. मार्च 2026 पर्यंत भारत नक्षलवाद मुक्त करण्याचे केंद्र सरकारचे लक्ष्य आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी वारंवार ते बोलूनही दाखवले आहे. कर्रेगुट्टा एन्काऊंटरमध्ये 31 नक्षलवाद्यांना ठार मारल्यानंतरही हे ऐतिहासिक यश असल्याचे सांगत त्यांनी सुरक्षा दलांचे कौतुक केले होते.
नंबाला केशव रावच्या कारवाया-छत्तीसगड, महाराष्ट्र आणि ओडिशामध्ये पोलिस आणि मोठ्या राजकीय नेत्यांवर झालेल्या हल्ल्यांचा मास्टर माईंड नंबाला केशव राव हाच होता. 2010 मध्ये दंतेवाडा मध्ये झालेल्या हल्ल्यात केंद्रीय राखीव दलाचे 76 जवान शहीद झाले होते. त्यानंतर जीरम घाटी मध्ये झालेल्या हल्ल्यात काँग्रेस नेते विद्याचरण शुक्ल, महेंद्र कर्मा व नंदकुमार पटेल यांच्यासह 27 जण ठार झाले होते. 23 सप्टेंबर 2018 मध्ये आंध्रपदेश मधील सत्तारुढ तेलगू देसम पक्षाचे आमदार किदरी सर्वेश्वर राव आणि माजी आमदार सिवेरी सोमा यांची ओडिशाच्या सीमेवर हत्या करण्यात आली होती. या घटनांमध्ये नंबाला केशव राव याचीच योजना असल्याचे त्यावेळी बोलले जात होते.
इंजिनिअर असलेला सर्वोच्च नेता ठार-तो माओवादी चळवळीत सक्रिय होता. एम्बुश लावणे, जिलेटिनचा स्फोट घडवून आणणे या बाबींमध्ये तो पारंगत होता. त्याने गुर्रिल्ला वॉरचे लिट्टेकडून प्रशिक्षण घेतल्याचेही सांगितले जाते.
*पंतप्रधान, गृहमंत्र्यांनी थोपटली पाठ

या कारवाईनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी सुरक्षा दलांचे कौतुक केले. कारवाईचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत कौतुक केले आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल आम्हाला सुरक्षा दलाचा अभिमान आहे. नक्षलवाद मुक्त भारत करण्यासाठी तसेच देशातील नागरिकांना शांतता आणि प्रगतीचे जीवन सुनिश्चित करण्यासाठी आमचे सरकार वचनबद्ध आहे. असे त्यांनी म्हटले आहे. तर गृहमंत्री अमित शहा यांनी आपल्या पोस्टमध्ये सुरक्षा दलांचे कौतुक केले.

*इंजिनिअर असलेला सर्वोच्च नेता ठार

चकमकीत देशातील नक्षल चळवळीचा सर्वोच्च नेता, पॉलिट ब्युरो सदस्य तथा माओवादी कम्युनिस्ट पार्टीचा महासचिव नंबाला केशव राव उर्फ गगन्ना उर्फ बसव राजू ठार झाला. अभियांत्रिकीची पदवी घेतलेला तरुण ते नक्षल्यांचा देशातील सर्वोच्च नेता असा नंबाला केशव राव याचा नक्षल चळवळीतील प्रवास आहे. 70 वर्षीय नंबाला आंध्रप्रदेशातील श्रीकाकुलम जिल्ह्यातील जियान्नापेठ गावातील होता. त्याने आंध्रपदेशातील वारंगळ येथून नॅशनल इन्स्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मधून बी. टेकची पदवी संपादन केली होती. 1970 पासून

संबंधित बातम्या

Back to top button