सटोर्याकडून महिलेला त्रास; दुचाकीवर बसवले गुप्त जीपीएस
राजापेठ पोलिसांकडे तक्रार

अमरावती /19 नोव्हेंबर – शहरातील एका महिलेला मागील तीन महिन्यांपासून सतत त्रास देणार्या क्रिकेट सटोर्याने हद्द ओलांडत तिच्या दुचाकीवर गुप्त जीपीएस बसविल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. संबंधित महिलेने याबाबत राजापेठ पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली असून पोलिसांनी आरोपी राजकुमार बागडीविरुद्ध गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राजापेठ परिसरात राहणार्या पीडित महिलेची कपड्यांची दुकान असून घरातील जबाबदार्या तीच सांभाळते. तिचा पती सतत आजारी असल्याने व्यवसाय आणि कुटुंबाची धुरा ती एकटीच पेलत आहे.
या परिस्थितीचा फायदा घेत आरोपी बागडी मागील तीन महिन्यांपासून संबंधित महिलेला फोन करून संभाषण करण्याचा, तिच्याजवळ येण्याचा प्रयत्न करत होता. महिलेने प्रतिसाद न दिल्याने त्याने वारंवार तिला धमकावणे सुरू केले. काही दिवसांपूर्वी महिलेचा पती उपचारासाठी रुग्णालयात असताना आरोपी बागडी तिच्या घरात घुसला आणि जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. महिला आरडाओरड करताच तो शिवीगाळ करत पळून गेला. त्या घटनेनंतरही त्याचा त्रास थांबला नाही. तो सतत तिचा पाठलाग करू लागला, दुकानात येऊन विनाकारण बोलण्याचा आग्रह धरू लागला. हा प्रकार वाढत गेल्यानंतर महिलेनं आपल्या पतीला ही बाब सांगितली. पतीनंही आरोपीला समजावण्याचा प्रयत्न केला; मात्र बागडीने त्यालाही जीवे मारण्याची धमकी दिली. महिलेचा छळ थांबावा म्हणून आरोपीने काही सटोर्यांना तिच्या हालचालींवर नजर ठेवण्याचे आदेश दिल्याचेही महिलेनं तक्रारीत नमूद केले आहे. त्यातील एक युवक सतत तिच्या मागे येत असल्याचे तिला आढळून आले. त्याचा फोटो काढून तिने तो पतीला दाखविला. परिस्थिती गंभीर होत असल्याने महिलेनं काही दिवसांपूर्वी पोलिसांकडे तक्रार केली होती. तथापि, त्यानंतरही आरोपीचा त्रास थांबला नाही. 16 नोव्हेंबरला रात्री 11.13 वाजता आरोपीने तिला फोन करून बदनाम करण्याची आणि जीवे मारण्याची धमकी दिली. यामुळे दहशतीत राहणार्या महिलेनं पुन्हा 18 नोव्हेंबर रोजी राजापेठ ठाण्यात तक्रार नोंदवली. नवीन धक्कादायक बाब म्हणजे, महिलेनं नुकतेच लक्षात आणले की तिच्या पांढर्या रंगाच्या एक्टिवावर आरोपीने जीपीएस डिव्हाइस बसविले आहे. त्या प्रणालीशी 7972529373 हा मोबाईल नंबर जोडलेला असल्याचे तिला आढळले. त्यामुळे ती कुठेही गेली तरी आरोपी तिच्या हालचालींचा माग काढत असे. तसेच आरोपीने ‘हेमंत’ नावाच्या




