भाजप या निवडणुकीत काँग्रेसचा सफाया करणार
डॉ. अनिल बोंडे यांचा काँगेसवर हल्लाबोल

* 12 नगराध्यक्ष पदे आणि बहुसंख्य सदस्य पदांवर विजय मिळवण्याचा दावा
अमरावती /28 नोव्हेंबर : भाजप या निवडणुकीत काँग्रेसचा पूर्ण सफाया करणार, असा ठाम दावा भाजपचे ज्येष्ठ नेते व राज्यसभा सदस्य डॉ. अनिल बोंडे यांनी करताच अमरावती जिल्ह्यातील नगरपरिषद निवडणुकांचे राजकीय वातावरण अधिक तापले आहे. 2 डिसेंबर रोजी होणार्या निवडणुकांमध्ये भाजप सर्व 12 नगराध्यक्ष पदांवर तसेच सदस्य पदांपैकी निम्म्याहून अधिक जागांवर अभूतपूर्व विजय मिळवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
निवडणूक प्रभारी म्हणून जिल्हाभर सतत दौरे करत असल्याचे सांगत त्यांनी तरुण आणि महिला मतदारांकडून मिळणारा सकारात्मक प्रतिसाद हा भाजपच्या विजयाचा मुख्य आधार ठरणार अस ल्याचे सांगि तले. जनतेने गेल्या काही वर्षांत पक्षाच्या काम काजावर दाख वलेला विश्वास यंदाच्या निवडणुकीत स्पष्टपणे दिसून येणार आहे, असे ते म्हणाले. संघटनात्मक बळाबाबत बोलताना त्यांनी नमूद केले की, भाजपने गेली चार वर्षे सातत्यपूर्ण तयारी केली असून कार्यकर्ते थेट मतदारांशी संपर्कात आहेत. त्यामुळे पक्षाची ताकद कोणत्याही प्रतिस्पर्ध्यापेक्षा खूपच मजबूत झाली आहे. महायुतीतील काही घटक पक्षांचे उमेदवार मैदानात असले तरी त्याचा भाजपच्या विजयावर कोणताही परिणाम होणार नसल्याचा त्यांनी विश्वास व्यक्त केला. काँग्रेसवर टीका करताना डॉ. बोंडे म्हणाले, काँग्रेसमध्ये गंभीर अंतर्गत वाद आहेत. त्यांच्या नेत्यांकडून स्वतःच्या उमेदवारांनाही पुरेसा पाठिंबा मिळत नाही. जिल्ह्यात काँग्रेसचे अस्तित्व जवळजवळ नाहीसे झाले आहे. शिवसेना (उद्धव गट) आणि राष्ट्रवादी (शरद पवार गट) यांचेही प्रभाव क्षेत्र अत्यल्प असल्याने विरोधकांची ताकद कमकुवत झाल्याचे त्यांनी सांगितले. एकूण परिस्थिति पाहता, या निवडणुकांत भाजप काँग्रेसचा पूर्ण सफाया करणार आणि जिल्ह्यात प्रचंड बहुमताची सत्ता स्थापन करणार, असा ठाम दावा डॉ. बोंडे यांनी व्यक्त केला.




