वाहनधारकांनो हाय-सिक्युरिटी नंबर प्लेट बसवा
वाहनांवर एचएसआरपी लावणे बंधनकारक, मुदतवाढीनंतर 30 जून अंतिम तारीख

अमरावती /7 जून- केंद्रीय मोटार वाहन नियमांतर्गत महाराष्ट्र शासनाने सर्व वाहनांवर हाय-सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट (एचएसआरपी) लावणे अनिवार्य केले आहे. नंबर प्लेटमधील छेडछाड, फसवणूक आणि गुन्हेगारी रोखून राष्ट्रीय सुरक्षा मजबूत करणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे.
प्रादेशिक परिवहन विभागाच्या माहितीनुसार, जिल्ह्यातील सर्व वाहनधारक, शासकीय-निमशासकीय कार्यालये आणि बँकांना 1 एप्रिल 2019 पूर्वीच्या वाहनांवर एचएसआरपी लावणे बंधनकारक आहे. यासाठी आधी 31 डिसेंबर 2025 ची मुदत होती, जी वाढवून आता 30 जून 2026 करण्यात आली आहे. प्रादेशिक परिवहन अधिकारी उर्मिला पवार यांनी सांगितले की, मुदतीनंतर विना एचएसआरपी वाहनांवर दंडात्मक कारवाई होईल व परिवहनची कामे रोखली जातील. त्यांनी 30 जूनपूर्वी एचएसआरपी लावण्याचे आवाहन केले आहे.




