विविध उपक्रमांनी महापुरुषांच्या जयंती उत्सव

प्रतिष्ठा बहुउद्देशीय संस्थेचा उपक्रम

बडनेरा /26 फेब्रुवारी : बडनेरा येथून जवळअसलेल्या पिंपरी यादगिरे येथे दरवर्षीप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज, कर्मयोगी संत गाडगेबाबा व मातोश्री रमाई आंबेडकर यांची संयुक्त जयंती उत्सव आठ वर्षापासून मोठ्या थाटात साजरा करण्यात येत आहे.
नेहमीप्रमाणे यावर्षी दिनांक 22 व 23 फेब्रुवारी या रोजी साजरा करण्यात आला या जयंती उत्सव कार्यक्रमात स्वच्छता अभियान मोफत आरोग्य शिबिर राबविण्यात आले तसेच गावातील विद्यार्थ्यांचे विविध सांस्कृतिक कार्यक्रम मान्यवरांचे मार्गदर्शन, मान्यवरांचा सत्कार या कार्यक्रमात करण्यात आला. प्रतिष्ठा बहुउद्देशी संस्था यांच्या वतीनेे गावातील गुणवंत विद्यार्थ्यांचा व पालकांचा सत्कार करण्यात आला व शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करणार्‍या विद्यार्थ्यांना पुस्तक वाटप करण्यात आले, यशस्वी विद्यार्थ्यांच्या पालकांचा सत्कार करून , वृक्ष वाटप करून वृक्षारोपण करण्यास , प्रोस्ताहीत केले अनेक महापुरुषांच्या जीवन चरित्र्यावर नाटकाचे आयोजन करण्यात आले. संयुक्त जयंती कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माननीय रमेश कटके ,सर विलास थोरात, रवी कुमार गजभिये ,अस्मिता प्रवीण शिंदे इत्यादी पाहुणे उपस्थित होते .कार्यक्रमासाठी योगेश घुगरे, रतन थोरात, रवी उगले ,अविनाश राऊत ,दिनेश टेंभुर्णी सुप्रिया राऊत प्रिया जंजाळ समीक्षा घुगरे अर्जुन दाते गौरव जवंजाळ यथार्थ घुगरे सार्थक जवंजाळ विकास घुगरे यांनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाला युवक,विद्यार्थी, गावातील महिला मंडळ गावकरी मंडळी उपस्थित होते.

संबंधित बातम्या

Back to top button