एमडी ड्रग्जसह दोन आरोपी गजाआड

शहर गुन्हे शाखेची कारवाई

* 6.80 लाखांचा माल जप्त

अमरावती /7 डिसेंबर – अमली पदार्थ असणार्‍या एमडी ट्रक सह दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी कारवाईदरम्यान 6 लाख 82 हजार रुपयाचे एमडी ड्रग्स जप्त केले आहे. रविवारी सहायक पोलीस निरिक्षक मनीष एम वाकोडे गुन्हे शाखा हे कार्यालयात हजर असतांना गुप्त बातमीदाराकडून खात्रीशीर खबर मिळाली की, दोन इसम एका मोटर सायकल वर आपले जवळ अवैध्यरित्या मेथडॉन (एम.डी.) नावाचा अं ली पदार्थ बाळगुन आहेत. आरोपी नविन बायपास कडुन वडाळी कडे जाणार आहेत.
ज्यापैकी एका इसमाने अंगात भुरकट रंगाचा पॅन्ट व काळी टि शेट परिधान केलेली आहे व दुस-या इसमाने आपल्या अंगात निळी जिन्स पॅन्ट व पांढरी टिर्शट घातली असुन त्यांने दाढी ठेवली आहे. माहिती मिळताच पोलीस पथकाने घटनास्थळ घासून दोन्ही आरोपींची चौकशी केली. पोलिसांनी आरोपी मोहमद सोफियान मोहम्मद मन्नान (वय 24 वर्ष रा. अन्सार नगर, मुसा किराणा जवळ अमरावती) तसेच शोयेब खान समीर खान (वय 24 वर्ष रा. अमरावती) यांना ताब्यात घेतले. आरोपीचे अंग झडती घेतली असतास आरोपीचे ताब्यातून अंदाजे वनज 69 ग्रॅ एम. डी ज्याची किंमत 6,82,000 रू. तसेच त्याचे कडून गाडी व इलेक्टीक वजन काटा व दोन मोबाईल असा एकून 7,41,000 रु मुददेमाल जप्त करण्यात आला आहे आरोपीतानी संदर माल कोणाकडून आणला या बाबत त्यांचे कडे प्राथमीक तपास केला असता त्याने सैय्यद अल्तमश सैय्यद गफ्फार (रा. अन्सार नगर, अमरावती, गोलु कबीर (रा. अन्सार नगर अमरावती), आवेज कुरेशी आरीफ कुरेशी (रा. गवळीपुरा अमरावती), साकीब कुरेशी उर्फ हज्या (रा. अन्सार नगर), आकीब कुरेरी, शेख नई उर्फ राजा शेख रहीम उर्फ होंगा, शेख नाझीम शेख रहीम उर्फ होंगा, शेख सोनू शेख रहीम उर्फ होंगा असे नमूद वरिल आरोपी के एकून 1 ते 8 कडून एम.डी घेतली असून त्यांचे सांगणेप्रमाणे ग्राहकाना विकी करत असून त्याला प्रत्येक खेपचे पैसे मिळत असल्याचे सांगीतले. त्याबाबत सवीस्तर तपास अमरावती आयुक्तालय येथील अ‍ॅन्टी नारकोटीक सेल करित आहे. सदरची कारवाई पोलीस आयुक्त, अरवींद चावरिया, पोलीस उपआयुक्त रमेश धुमाळ (मुख्यालय), पोलीस उपआयुक्त गणेश शिंदे, पोलीस उपआयुक्त श्याम घुगे, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) शिवाजी बचाटे, वरिष्ठ गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक संदीप चव्हाण,सपोनि मनीष वाकोडे, पोउपनि गजानन सोनुने, अंलदार अजय मिश्रा, फिरोज खॉन, सतिश देशमूख, मंगेश लोखंडे, प्रंशात मोहोड, सचीन बहाळे सैयद नाझीम, रणजीत गावंडे, चेतन कराडे चालक प्रभात पोकळे तसेच सायबर पो. स्टे चे सपोनि अनिकेत कासार, प्रियंका कोटावार, निखील माहूरे यांनी केलेली आहे.

संबंधित बातम्या

Back to top button