विद्यापीठ नवउद्योजकांना उपलब्ध करुन देणार संधी
इन्क्युबेशन सेंटरचा कॅट आणि चेंबरसोबत करार

अमरावती / 13 जुलै: उद्योजकतेला चालना देण्यासाठी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या अंतर्गत कार्यरत रिसर्च अँड इन्क्युबेशन फाउंडेशन आणि कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स तसेच अमरावती चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री यांच्यात कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते व कुलसचिव डॉ. अविनाश असनारे, ननसा संचालक डॉ. अजय लाड यांच्या मार्गदर्शनाखाली सामंजस्य करार करण्यात आला. या कराराच्या माध्यमातून महिला उद्योजकांना तांत्रिक, व्यावसायिक व सल्लागार मदत, प्रशिक्षण, स्टार्टअपसाठी पोषक वातावरण आणि कौशल्य विकासाच्या संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
सामंजस्य करारावर विद्यापीठातर्फे इन्क्युबेशन सेंटरच्या संचालक डॉ. स्वाती शेरेकर व सीईओ आनंद यादव तर कॅटच्या वतीने राष्ट्रीय अध्यक्ष सीए बी.सी. भरतीया व विदर्भ अध्यक्ष विनोद कलंत्री यांनी स्वाक्षरी केली. अमरावती चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री सोबत झालेल्या करारावर अध्यक्ष विनोद कलंत्री व चेंबरच्या शिक्षण समिती सभापती डॉ. वर्षा देशमुख यांनी स्वाक्षरी केली. याप्रसंगी माजी खासदार नवनीत राणा, आमदार रवी राणा यांची विशेष उपस्थिती होती.
यावेळी डॉ. स्वाती शेरेकर, कॅटचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री भरतीया, कॅट विदर्भ व अमरावती चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीचे अध्यक्ष विनोद कलंत्री, कार्यकारणी सदस्य शाम शर्मा, विदर्भ महामंत्री निकेश गुप्ता, सौरभ मालाणी, विदर्भ मार्गदर्शक वसंत बछुका, अशोक डालमिया, महिला सेलच्या अध्यक्ष डॉ. कुंंजन वेद, अमरावती जिल्हाध्यक्ष गोविंद सोमाणी, आत्माराम पुरस्वाणी, गोपाल पांडे, उपस्थित होते. चेंंबर ऑफ कॉमर्स तर्फे दिनेश सूर्यवंशी, डॉ. वर्षा देशमुख, विरेंद्र लड्डा, रामेश्वर गग्गड, ओमप्रकाश नावंदर, मीनाक्षी सिकची, अॅड. जगदीश शर्मा, विद्यापीठातर्फे इन्क्युबेशन फाऊंडेशनचे राज्य समन्वयक आनंद यादव, अमोल हिरुळकर यांचीही उपस्थिती होती.
या सामंजस्य करारामुळे अमरावती व विदर्भातील नवउद्योजकांसाठी एक नवीन पर्व सुरू होणार असून उद्योजकतेच्या विकासाला अधिक बळकटी मिळणार आहे. विद्यापीठाच्या रिसर्च अँड इन्क्युबेशन फाउंडेशनकडून याआधीही स्टार्टअप्ससाठी सक्रीय मार्गदर्शन व प्रशिक्षण देण्यात आले असून, या करारामुळे ही प्रक्रिया अधिक प्रभावी होणार असल्याचे मत डॉ. स्वाती शेरेकर यांनी व्यक्त केले.




