पी.आर.पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपमध्ये क्रीडा महोत्सवाचा शुभारंभ

मैदानी व अंतर्गत खेळात विद्यार्थ्यांचा सहभाग

अमरावती /11 जानेवारी  : पी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या वतीने आयोजित वार्षिक क्रीडा महोत्सवाची उत्साहात सुरुवात झाली. यात अभियांत्रिकी, फार्मसी, एग्रीकल्चर, आर्किटेक्चर, बीएएमएस, नर्सिंग, एमबीए, एमसीए, बीएड च्या विद्यार्थ्यांचा सहभाग असणार आहे.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शैक्षणिक उपक्रमांसोबतच क्रीडाक्षेत्रालाही समान महत्त्व देण्याच्या उद्देशाने या क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून यावेळी सर्व महाविद्यालयाचे प्राचार्य , उप-प्राचार्य, डीन आणि क्रीडा शिक्षक प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी ध्वजारोहण करून स्पर्धांना प्रारंभ करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध संचलन करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. विविध मैदानी खेळांच्या स्पर्धांमध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळत आहे. या क्रीडा महोत्सवामध्ये कबड्डी, क्रिकेट, व्हॉलीबॉल, फुटबॉल, अ‍ॅथलेटिक्स तसेच विविध अंतर्गत क्रीडा स्पर्धांचा समावेश आहे. क्रीडेमुळे विद्यार्थ्यांमध्ये संघभावना, नेतृत्वगुण, शिस्त आणि आत्मविश्वास विकसित होतो, असे मत यावेळी मान्यवरांनी व्यक्त केले. क्रीडा महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी क्रीडा विभाग, प्राध्यापकवर्ग व स्वयंसेवक विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले आहेत.

संबंधित बातम्या

Back to top button