अंबा-एकवीरेच्या महाआरतीने उजळला प्रतप्रधानांचा वाढदिवस
भाजपच्या आयोजनात ‘मोदी मोदी’चा जयघोष

-डॉ. अनिल बोंडे दांपत्याकडून 75 दिव्यांनी पूजन
-शहर भाजपच्या महाआरतीस प्रचंड गर्दी
-परिसराला दीपझळाळी, कार्यकर्ते उत्साहात
अमरावती / 17 सप्टेंबर : अमरावती शहरातील अंबा आणि एकवीरा देवी मंदिरात आज सकाळी झालेली भव्य महाआरती ही भाजपच्या दोन स्वतंत्र आयोजनांनी रंगली. एकीकडे खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी पत्नी डॉ. वसुधा बोंडे यांच्यासह 75 दीप प्रज्वलित करून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दीर्घायुष्याची कामना केली, तर दुसरीकडे भाजप शहर संघटनेच्या नेतृत्वाखाली शहरातील सर्व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून महाआरती केली. दोन्ही आयोजनांनी मंदिर परिसर मोदी मोदीच्या जयघोषाने दुमदुमून गेला.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त आज शहरात भाजपकडून विविध धार्मिक तसेच सामाजिक उपक्रम घेण्यात आले. याची सुरुवात अंबा माता आणि एकवीरा देवी येथे भव्य महाआरतीने झाली. खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी पत्नी डॉ. वसुधा बोंडे यांच्यासह महाआरती करून 75-75 दिवे प्रज्वलित केले. ललाटी त्रिपुंड लावून देवीची परिक्रमा करताना डॉ. बोंडे यांनी मोदी हे यशस्वी नेतृत्व असून देश सर्व क्षेत्रांत प्रगती करीत आहे, असे सांगून मोदींचे आयुष्य शंभर वर्षांपर्यंत वाढावे, अशी देवीकडे प्रार्थना केली. त्यांनी मोदींनी अध्यात्माचा प्रसार जनमानसात रुजवून देशवासियांना आत्मिक प्रेरणा दिली असल्याचेही नमूद केले.
दरम्यान भाजप शहराध्यक्ष डॉ. नितिन धांडे, महिला शहराध्यक्ष सुधा तिवारी आणि भाजयुमोचे शहराध्यक्ष विक्की शर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या दुसर्या महाआरतीसही प्रचंड उत्साह लाभला. या दोन्ही आयोजनांमध्ये माजी मंत्री प्रवीण पोटे पाटील, किरण पातुरकर, वरिष्ठ विधिज्ञ अॅड. प्रशांत देशपांडे, प्रदेश प्रवक्ता शिवराय कुलकर्णी, जिल्हा महासचिव बादल कुलकर्णी, राधा कुरील, चेतन पवार, माजी उपमहापौर कुसुम साहू, नगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते सुनील काळे, माजी स्थायी समिती सभापती सचिन रासने, बलदेव बजाज, चंदू बोमरे, लविना हर्षे, नूतन भुजाडे, गंगा खारकर, सुरेखा लुंगारे, स्वाती कुलकर्णी, प्रणित सोनी, श्रीचंद तेजवानी, प्रा. डॉ. संजय तिरथकर, राजेश साहू (पड्डा), अजय सारसकर, ओबीसी मोर्चा अध्यक्ष विवेक चुटके, एससी मोर्चा अध्यक्ष अमोल थोरात, किसान मोर्चा अध्यक्ष मिलिंद बांबल, एसटी मोर्चा अध्यक्ष रेणुका पवार, अल्पसंख्यक मोर्चा अध्यक्ष एजाज अख्तर, मंडल अध्यक्ष छोटू वानखडे, संतोष कावरे, उमेश निलगिरे, प्रफुल बोके, भारती गुहे, राजू मेटे, कौशिक अग्रवाल, आकाश पाटील, सुनील खराटे, शीतल वाघमारे, जया माहोरे, कविता भागवत, शैलेंद्र मिश्रा, श्रीकांत धानोरकर, जगदीश कांबे, भूषण हरकूट, श्याम साहू, तुषार चौधरी, सूरज जोशी, शुभम वैष्णव, प्रवीण रुद्रकार, वैभव बेलसरे, सुमीत गुल्हाने, विकास सुने, गणेश खोत, अमोल सालुंखे, शुभम इंगळे, राजेश आखेगांवकर, भारत चिखलकर, कविता ठाकरे, श्रद्धा पाटेकर, सुनील साहू, तुषार वानखडे, प्रमोद राऊत, वंदना मडघे, प्रदीप सोलंके, अमृत यादव, शैलेंद्र मेघवानी, सदुभाऊ पुन्शी, रमेश टेंभरे, मनोज काळे, राजेश किटुकले, वनमाला सोनोने, माधुरी ठाकरे, कुणाल टिकले, संजय कटारिया, राजू कुरील, धनंजय भुजाडे, गजानन देशमुख, प्रवीण वैश्य, दीपक पोहेकर, अखिलेश खडेकार, सचिन डाके, रेखा शेंद्रे, रविकांत कोल्हे, सुहास गोंगे, रोहित यादव, अंकेश गुजर, कीर्ती इखार यांच्यासह भाजप पदाधिकारी-मोर्चाप्रमुख, नागरी कार्यकर्ते आणि महिला कार्यकर्त्यांची उत्साहपूर्ण उपस्थिती लाभली.
-स्वच्छता अभियानाने सेवा पंधरवड्याचा प्रारंभ
प्रधानमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपकडून राष्ट्रीय स्तरावर साजरा होणारा सेवा पंधरवडा आजपासून अमरावतीत सुरू झाला. भूतेश्वर चौक ते स्मशानभूमी परिसरात भाजप ओबीसी मोर्चा शहराध्यक्ष मिलिंद बांबल यांच्या नेतृत्वाखाली स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यावेळी डॉ. नितिन धांडे, सुधा तिवारी, विक्की शर्मा, बादल कुलकर्णी, ललित समदुरकर, राधा कुरील, चेतन पवार यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.




