अत्यंत आव्हानात्मक ऑर्बिटल ट्यूमर शस्त्रक्रिया यशस्वी

डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय येथे

अमरावती /20 जानेवारी : अमरावती येथील श्री शिवाजी शिक्षण संस्था व्दारा संचालित डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय येथे अत्यंत गुंतागुंतीची व आव्हानात्मक ऑर्बिटल ट्यूमर शस्त्रक्रिया प्रथमच पार पाडण्यात आली. सदर गाठ अत्यंत गंभीर व जीवघेणी स्वरूपाची असल्याने रूग्णाला यापूर्वी विविध वैद्यकीय केंद्रांमध्ये उपचारासाठी नकार देण्यात आला होता, तसेच शस्त्रक्रिया करणे धोकादायक असल्याचे सांगण्यात आले होते. महाविद्यालयाचे न्युरोसर्जरी विभागातील न्युरोसर्जन डॉ. स्वरूप गांधी तसेच तज्ज्ञ चमूच्या समन्वयातून व आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञानाच्या सहाय्याने यशस्वीरीत्या पार पडली आहे.
महिलेला कवटीच्या भागातून सूज बाहेर येणे तसेच डोळ्याच्या बुबुळाचे विस्थापन (झीेिीेींळी) अशी गंभीर तक्रार होती. तपासणीअंती करण्यात आलेल्या एम. आर. आय. मध्ये इंट्राकॅनियल एक्सटेन्शन असलेला ऑर्बिटल ट्यूमर आढळून आला. या ट्यूमरमुळे रूग्णाच्या पुढील कवटीच्या (ऋीेपींरश्र इेपश) हाडाचे नुकसान झाले होते.
ऑर्बिटल भाग योग्यरित्या उघडण्यासाठी ऋढजन (ऋीेपीें-ढशािेीे-जीलळीें-नूसेा रींळल) क्रेनिएक्टोमी पध्दतीने शस्त्रक्रिया करण्यात आली. हा ट्यूमर अत्यंत रक्तवहिन्या संबंधी असून त्याला मध्य मेनिन्जियल धम नीतून मोठ्या प्रमाणात रक्तपुरवठा होत असल्याचे शस्त्रक्रिये व्दारे ट्यूमरचे संपूर्ण एक्सिजन यशस्वी रित्या करण्यात आले. सदर रूग्णाच्या शस्त्र क्रियेचा खर्च महात्मा ज्योतीबा फुले जीवनदायी योजनेच्या माध्यमातून मोफत करण्यात आला. या शस्त्रक्रियेसाठी उत्कृष्ट सहकार्य केल्याबद्यल डॉ. अमोल ढगे यांचे विशेष आभार मानण्यात आले. तसेच ऑर्बिटल भाग सुरक्षितरीत्या काढून टाकण्यासाठी डॉ. अनुप चांडक, ऑक्युप्लास्टिक सर्जन यांचे मोलाचे योगदान उल्लेखनीय ठरले तसेच रूग्णाची प्रकृती स्थिर ठेवण्यासाठी व शस्त्रक्रियेचे काटेकोर व्यवस्थापन करण्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख रूग्णालयाच्या बधिरिकरणशास्त्र विभाग, परिचारिका व कर्मचारी वर्गाने समर्पक योगदान देत अत्यंत महत्वाची भूमिका बजावली. पीडीएमएमसी येथील तज्ञ वैद्यकीय डॉक्टरांच्या उत्कृष्ट कौशल्याने, अत्यंत आव्हानात्मक असलेली शस्त्रक्रिया परस्पर समन्वयाने व प्रगत उपचारपध्दतींच्या सहाय्याने यशस्वीरित्या पार पाडल्या बद्दल श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धनजी प्र. देशमुख, अधिष्ठाता डॉ. अनिल देशमुख, वैद्यकीय अधिक्षक डॉ. पवन टेकाडे, सर्जरी विभागप्रमुख डॉ. अनिल दारोकर, प्रशासकीय अधिकारी डॉ. स्वप्निल मोहोड यांनी संपूर्ण तज्ञ चमूचे अभिनंदन करून त्यांना पुढील रूग्णसेवेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

संबंधित बातम्या

Back to top button