अनिल अग्रवाल, दिनेश बूब यांच्या निवडीने राजस्थानी समाजात उत्साह

अनुभवी नेतृत्वामुळे मिळणार विकासाला गती

समाजाच्या हितासाठी ठोस पाऊले उचलण्याचा निर्धार

अमरावती /20 फेब्रुवारी – महानगरपालिकेच्या स्वीकृत सदस्यपदी ज्येष्ठ संपादक अनिल अग्रवाल आणि अनुभवी लोकप्रतिनिधी दिनेश बूब यांची निवड झाल्याने संपूर्ण राजस्थानी समाजात उत्साहाचे वातावरण पसरले आहे. अग्रवाल, माहेश्वरी, ओसवाल, राजस्थानी ब्राह्मण महासभा आणि राजपुरोहित महासभेसह सर्वच स्तरांतून या निर्णयाचे स्वागत होत असून सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अनिल अग्रवाल यांनी या निवडीबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना शहराच्या आणि समाजाच्या हितासाठी ठोस पावले उचलण्याचा निर्धार केला आहे, तर चार वेळा नगरसेवक राहिलेल्या दिनेश बूब यांच्या अनुभवाचा पालिकेला मोठा फायदा होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.
या निवडीचे वृत्त समजताच राजस्थानी हितकारक मंडळाचे सचिव रामेश्वर गग्गड यांच्या नेतृत्वाखाली शेकडो मान्यवरांनी महापालिकेत धाव घेऊन जल्लोष केला. यामध्ये पं. देवदत्त शर्मा, किशोर गोयंका, सुरेश साबू, महिला अध्यक्षा उर्मिला कलंत्री, किरण मुंधडा, युवा अध्यक्ष अमित मंत्री, प्रा. जगदीश कलंत्री, जुगलकिशोर गट्टानी, राजेंद्र सोमाणी, कमलकिशोर मलानी, प्रा. विजय भांगडिया, सुरेश जैन, पुरुषोत्तम मुंधडा, अशोक सोनी, देवदत्त जोशी, गोपाळ राठी, व्यंकटलाल राठी, गोपाळ चांडक, अनिल नरेड्डी, राजेंद्र मोहता, शांतीलाल कलंत्री, श्याम शर्मा, मुकेश चांगणी, संजय अग्रवाल, मुकेश लोहिया, नंदकिशोर कलंत्री, प्रवीण चांडक, नौका महाराज, संदीप राठी, अजय मंत्री, हुकमीचंद खंडेलवाल, रमेश साभद्रा, अनिल कोठारी, संजय मुनोत, संतोष कासट, किरण समरा, श्रीकृष्ण व्यास, खुशाल जोशी, राजेश मित्तल, गौरव लुणावत, गोपाळ बजाज, कृष्णकांत लाहोटी, प्रमोद राठी, घनश्याम वर्मा, कमल सोनी, राजेंद्र केडिया, डॉ. रवींद्र खेतान, प्रकाश काकानी, संजय खंडेलवाल, विशाल राठी, विजय रोहतास, सुरेश राठी, श्रीनिवास टवाणी, अजय चौधरी, सुरेश रतावा, विजय खंडेलवाल, विजूभाई खंडेलवाल, कमल खंडेलवाल, राजू चुडीवाला, संजय नवरंग अग्रवाल, मनीष अग्रवाल, हनुमानशेठ अग्रवाल, राधेश्याम अग्रवाल, निलेश डागा, नरेश तिवारी, विजय अग्रवाल, ओमप्रकाश चांडक, अशोक जाजू, आनंदीलाल डागा, रामप्रकाश गिल्डा, लक्ष्मीकांत आसोपा, राजेंद्र वर्मा, शरद कासट, विनोद राठी, जुगल राठी, प्रा. गिरीश डागा, प्रा. सीताराम राठी, आनंद मालपाणी, जगदीश गग्गड, गोपाळ झंवर आणि नट्टू झंवर यांसह संपूर्ण राजस्थानी समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता. अग्रवाल समाजाचे अध्यक्ष विजय केडिया, सुरेश साबू आणि पप्पू चांगणी यांनीही अग्रवाल यांच्या सुसंस्कृत नेतृत्वावर विश्वास दर्शविला आहे.

समाजहितासाठी ठोस कामांचा संकल्प

स्वीकृत सदस्य अनिल अग्रवाल यांनी आपल्या पहिल्या प्रतिक्रियेत सांगितले की, त्यांचा मुख्य भर अमरावतीच्या सर्वांगीण विकासावर आणि समाजहिताच्या कामांवर असेल. काँग्रेस पक्षाने त्यांच्यावर जो विश्वास दाखवला आहे, त्याबद्दल त्यांनी आभार मानले असून आपल्या प्रदीर्घ संस्थात्मक अनुभवाचा वापर ते महापालिकेच्या कामकाजात सुधारणा करण्यासाठी करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

संबंधित बातम्या

Back to top button