यज्ञा दुसाने अत्याचार प्रकरणी आरोपीला फाशीची शिक्षा द्या
फास्टट्रॅक न्यायप्रक्रिया सुरू करण्याची मागणी

* सोनार समाज बांधवाचे जिल्हाधिकार्यांना निवेदन
अमरावती /17 नोव्हेंबर : मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथील चार वर्षीय कुमारी यज्ञा दुसाने या चिमुकलीवर झालेल्या अत्याचार आणि निर्घृण हत्येप्रकरणी आरोपीला तातडीने फाशीची शिक्षा द्यावी, तसेच प्रकरण फास्टट्रॅक न्यायालयात चालवून पीडित परिवाराला न्याय मिळवून द्यावा, अशी एकमुखी मागणी समस्त सोनार समाजाने केली आहे. यासाठी समाजाच्या शिष्टमंडळाने अमरावतीचे जिल्हाधिकारी येरेकर यांना निवेदन सादर केले. डोंगराळे गावातील दुसाने कुटुंबातील या बालिकेवर एका विकृत नराधमाने बलात्कार करून तिची क्रूरपणे हत्या केली. या हृदयद्रावक घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली असून पोलिसांनी निपक्षपाती तपास करून आरोपीला कठोर शिक्षा मिळवून द्यावी, अशी विनंती निवेदनात करण्यात आली. योग्य कारवाई न झाल्यास राज्यव्यापी आंदोलन छेडण्याचा इशाराही समाज बांधवांनी दिला. निवेदन देताना सोनार समाजातील ज्येष्ठ, महिला, युवक आणि विविध संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी या घटनेचा जाहीर निषेध नोंदवला. या शिष्टमंडळात श्री. नरहरी माळवी, सोनार संघाचे अध्यक्ष राजेश अनासाने, उपाध्यक्ष डॉ. विनोद गुहे, राजेंद्र धरमठोक, सचिव प्रा. रवींद्र प्रांजळे, कोषाध्यक्ष नितीन खांडेकर, सहसचिव मंगेश नेरेकर, अमरावती जिल्हा सुवर्णकार संघाचे सराफा अध्यक्ष अजय तीनखेडे, निलेश मरोडकर, दिलीप दाभाडे, प्रकाशराव तारेकर, नंदकिशोर गुंबळे, अरविंद विंचुरकर, विनायकराव चेडे, नारायणराव नेरकर, किरण विंचुरकर, नितीन शेरेकर, नरेंद्र शेरेकर, निलेश गुहे यांसह मोठ्या संख्येने समाजबंधू उपस्थित होते. महिला आघाडीत जोशना हिरुळकर, प्राजक्ता बानूवाकोडे, अनिता अनासाने, अर्चना खांडेकर, पल्लवी अनासाने, मयुरी पाटणे, आरती बैतुले, विना हिरूळकर, प्रीती बुटे, स्वाती अस्तुलकर, अपर्णा हाडे आदींचा सहभाग होता. समाजाच्या या निवेदनातून आरोपीला तात्काळ फाशीची शिक्षा देऊन पीडित कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा, अशी स्पष्ट मागणी करण्यात आली. समस्त सोनार समाजाच्या या निवेदनातून आरोपीला तातडीने फाशीची शिक्षा देऊन पीडित कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा, अशी एकमुखी मागणी करण्यात आली.




