तपोवन अमरावतीचा लोकगौरव, विकास करणार

आ. सुलभा खोडके यांचे प्रतिपादन

* दाजीसाहेब पटवर्धन यांचा 135 वा जयंती सोहळा उत्साहात

अमरावती /29 डिसेंबर : तपोवन केवळ अमरावती शहराचा लोकगौरव नसून तपोवन जनसेवा कार्याचा अखंड दिपस्तंभ आहे. समाजाने नाकारलेले कुष्ठबांधव व उपेक्षीतांकरीता महान तपस्वी पद्मश्री डॉ. शिवाजीराव उपाख्य दाजीसाहेब पटवर्धन यांनी विदर्भ महारोगी सेवा मंडळ तपोवन संस्थेची स्थापना केली.
दाजी साहेब यांच्या पश्चात नियामक समिती दाजीसाहेबांच्या विचारांवर संस्था चालवित होते. मात्र, दाजीसाहेबांचे अनुयायी प्राचार्य डॉ. सुभाष गवई यांच्या अध्यक्षतेखाली तपोवन संस्थेच्या विकासाला गती मिळाली आहे. नवनवीन उपक्रम, उद्योगांना चालना व शासन-प्रशासन स्तरावर संस्थेच्या विकासाकरीता एक यशस्वी पाऊल टाकले आहे. दाजीसाहेबांच्या विचारांचे पाईक असलेले मी व आ. संजय खोडके यांनी मागील काही महिन्यामध्ये तपोवन संस्था व कुष्ठ बांधवांच्या सक्षमीकरणाकरीता अनेक प्रस्ताव मान्य करून घेतले आहे. येत्या काही महिन्यामध्ये तपोवन संस्थेच्या विकास कार्याला गती मिळणार असून अमरावती लोकगौरव असलेल्या तपोवन संस्थेच्या सर्वांगीण विकासाकरीता खोडके दाम्पंत्य कटीबद्ध असून तपोवन संस्थेचा निश्चितपणे विकास होणार अशी ग्वाही आ. सुलभाताई खोडके यांनी दिले.
विदर्भ महारोगी सेवा मंडळ तपोवन येथे संस्थापक पद्मश्री डॉ. शिवाजीराव उपाख्य दाजीसाहेब पटर्वधन यांचा 135 वा. जयंती सोहळ्याचे आयोजन रविवार दि.28 डिसें. रोजी सायं.4.30 वाजता शिव उद्यान येथे आयोजीत करण्यात आला होता. या जयंती सोहळ्याचे मुख्य अतिथी म्हणून आ. सुलभाताई खोडके बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर अध्यक्ष म्हणून तपोवन संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. सुभाष गवई उपस्थित होते. प्रमुख उपस्थितीमध्ये मातोश्री कमलताई गवई, सुदर्शन गांग, डॉ. गोविंद कासट, प्राचार्य दिपक धोट, तपोवन नियामक समिती सदस्य विवेक अरूण मराठे, अमरावती विद्यापीठाचे श्रीकांत पाटील, प्रा. संजय रेड्डी, प्रदीप जैन, प्रतिक राठी, सचिव सहदेव गोळे, अश्वीन आळशी, भिमराव ठवरे, ऋषिकेश देशपांडे, विद्याताई देसाई, योगेश करडे, डॉ. जामोदे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरूवात दाजीसाहेबांच्या पुर्णाकृती पुतळ्याला हारार्पण करून झाली. यानंतर दाजीसाहेबांचे व्यक्तीमत्व, कार्य आणि विचार यावर उपस्थित मान्यवरांनी प्रकाश टाकत प्रेरणादायी मार्गदर्शन केले. शहरातील सुप्रसिद्ध व्यक्तीमत्व सुदर्शन गांग म्हणाले, एकदा अमेरीकेचे राष्ट्राध्यक्ष लिंकन रस्त्याने जात असतांना त्यांना एका ठिकाणी गर्दी दिसली. ते सुद्धा तेथे गेले आणि पाहिलं की, एक प्राणी पाण्यात पडला आहे आणि बाहेर येण्यासाठी धडपड करीत आहे. त्या ठिकाणी गर्दी होती मात्र ती केवळ बघणार्‍यांची. त्याचे वेळी लिंकन यांनी पाण्यात उडी घेत त्या प्राण्याला बाहेर काढले. लोकांन प्रशंसा केली, मात्र लिंकन म्हणाले, हे मोठे काम नसून त्या जीवाच्या वेदनेचा स्पर्श मनाला झाला म्हणून त्याची मदत केली. उत्तर अगदी सोप मात्र त्यातील अर्थ परिपक्व होता. हाच अर्थ दाजीसाहेबांनी आपल्या जगण्यातून, कार्यातून आणि विचारातून समाजाला दिला आहे. समाजाने ज्यांना नाकारले त्यांची वेदना दाजीसाहेबांना कळली आणि तपोवन संस्था उभारल्या गेली. दाजी साहेबांच्या कार्य त्यांच्याच विचारांनी अध्यक्ष डॉ. सुभाष गवई व नियामक समिती पुढे नेत आहे. त्यांच्या कार्याला समाजाने बळ द्यावे असे आवाहन त्यांनी केले. प्राचार्य दिपक धोटे यांनी पद्मश्री दाजीसाहेब व तपोवन चे महत्व आजच्या युवापीढीमध्ये रुजवण्याची गरज आहे असे त्यांनी सांगीतले. ते म्हणाले, त्या अनुषंगाने अध्यक्ष डॉ. सुभाष गवई यांनी शाळा, महाविद्यालयात व्याख्यान उपक्रम राबवित तरूणांना तपोवनच्या कार्याशी जुळवून घेतले आहे. त्याचाच एक भाग म्हणुन ब्रजलाल विद्यालयातील विद्यार्थांनी दरवर्षीचा स्नेहसंमलेनाचा खर्च तपोवन संस्थेला दिला. ही बाब प्रेरणादायी असून तरूण वर्गाला तपोवनशी जोडल्यास संस्थेच्या विकासाला गती मिळेल असा विश्वास प्राचार्य दिपक धोटे यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाचे प्रस्ताविक उपसचिव ऋषिकेश देशपांडे यांनी केले. संचलन प्रा. माधुरी सहारे यांनी तर आभार सचिव सहदेव गोळे यांनी मानले. जयंती सोहळ्याला माजी विद्यार्थी, संस्थेचे नियामक समिती सदस्य, संस्थेतील कर्मचारी, पदाधिकारी, विद्यार्थी आणि मोठया संख्येने नागरीक उपस्थित होते.

संबंधित बातम्या

Back to top button