धामणगाव गढीतील वृक्षतोडीवर संशय, स्थानिकांचा संताप

अचलपूर/2 जानेवारी -: धामणगाव गढी परिसरात विकासकामांच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. चिखलदरा जाणार्‍या मुख्य मार्गावर अनेक बिल्डरांनी लेआउट टाकून प्लॉट विक्रीचा व्यवसाय सुरू केला आहे. यामध्ये एका बिल्डरने मोठमोठे वृक्ष तोडून लेआउट तयार करण्याचा प्रयत्न सुरू केल्याचे स्थानिकांनी निदर्शनास आणले आहे.
शासन मान्यता नसल्याचा आरोप-या लेआउटमध्ये कोणत्याही प्रकारचे शासनमान्य बोर्ड दिसत नसल्याने नागरिकांमध्ये संशय निर्माण झाला आहे. अधिकृत प्लॉट विक्रीचे कोणतेही पुरावे उपलब्ध नसतानाही जमिनीवर लेआउटचे प्राथमिक काम सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे. सामाजिक वनीकरणाची झाडे तोडली गेल्याची माहिती ! प्राप्त सूत्रांनुसार, ज्या झाडांची तोड करण्यात आली ती सामाजिक वनीकरण विभागाने लावलेली असल्याचे समजते. त्यामुळे ही वृक्षतोड परवानगीशिवाय झाल्याचा गंभीर आरोप स्थानिकांनी केला आहे.
जनतेची मागणी -स्थानिक जनता व वृक्षप्रेमींनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित बिल्डरवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. विना परवानगी वृक्षतोड करून विकासकामे करणे हा पर्यावरणाचा गंभीर अपमान आहे. शासनाने तातडीने हस्तक्षेप करून दोषींवर कार्यवाही करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

या घटनेमुळे प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, पर्यावरण रक्षणासाठी तातडीने तपास व कारवाई होणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

संबंधित बातम्या

Back to top button