उमेदवारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहा
हर्षवर्धन सपकाळ यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

* भाजपाने महाराष्ट्रातील राजकीय संस्कृती नासवली
अंजनगाव सुर्जी/20 नोव्हेंबर : साधूसंतांच्या हत्तेतील आरोपी आणी ड्रग्ज प्रकरणातील आरोपींना निवडणुकीत ऊभे करुन महाराष्ट्रातील राजकिय सस्कृतीला नासवण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टी करीत असल्याचा आरोप राष्ट्रीय काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला व नगर पालिका निवडणुकीत काँग्रेस च्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे रहा असे आवाहन कार्यकर्ता मेळाव्याला संबोधित करतांना केले गुरुवार (ता.20) ला स्थानिक प्रभा मंगलम येथे आयोजीत कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी विचारमंचावर खासदार बळवंत वानखडे,माजी आमदार विरेद्र जगताप,नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आयेशा बानो रशीद खन्ना ,तालुका अध्यक्ष प्रमोद दाळू,अनंत साबळे,शहर अध्यक्ष प्रदिप देशमुख, प्रामुख्याने उपस्थित होते.तर यावेळी राष्ट्रवादी चे उपमुख्यमंत्री अजीत पवार यांचा सुद्धा समाचार सपकाळ यांनी घेतला मुलाने 50 एक शेतीचा करोडो रुपयाचा व्यवहार केला आणि बापाला याबद्दल काहीच माहीत नाही.ज्यामुळे येणाऱ्याभविष्यात शेतकऱ्याच्या जमीनी लाटण्यासाठी सत्ताधारी कुठल्याही स्तराला जाऊ शकतात असा ओरोप त्यानी केला. तर काँग्रेसच्या नगराध्यक्षासह सर्व उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन त्यांनी केले यावेळी अंजनगाव नगरपरीषदेकरीता रिंगणात असलेले सर्व उमेदवार आणि मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते हे विषेश. अंजनगावसुर्जी शहरात मुस्लीम उमेदवार दिल्यामुळे काही लोक माझ्यावर काँग्रेस ची बी टीम असल्याचा आरोप करीत असल्याचे खासदार बळवंत वानखडे यांनी सांगीतले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश सचीव व माजी सिनेट सदस्य स्मीताताई घोगरे यांनी यावेळी प्रदेशाध्यक्षांच्या हस्ते काँग्रेस पक्षात प्रवेश केला.




