विशेष रेल्वे अमरावतीहून पंढरपूरला रवाना

‘माझे जिवीची आवडी...पंढरपूरा नेईन गुढी’

-आषाढीसाठी शेकडो वारकर्‍यांचे प्रस्थान
-खा. बळवंत वानखडेंनी दाखविली हिरवी झेंडी
-भक्तीत तल्लीन झाले नविन अमरावती रेल्वे स्थानक
अमरावती / 2 जुलै: नवीन अमरावती रेल्वे स्थानकावर आज एक ऐतिहासिक आणि भावनिक क्षण अनुभवायला मिळाला. विशेष रेल्वे गाडीने आज शेकडो वारकर्‍यांनी आषाढीनिमित्त विठूरायाच्या दर्शनासाठी शेकडो वारकर्‍यांनी या गाडीने पंढरपूरकडे प्रस्थान केले. पांडूरंगाच्या नामगजराने नवीन अमरावती रेल्वे स्थानक भक्तीमय वातावरणात न्हाउन निघाले होते. खासदार बळवंत वानखडे यांच्या हस्ते पंढरपूर येथे निघालेल्या विशेष रेल्वे गाडीला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. याप्रसंगी गाडीतील प्रवासी वारकर्‍यांमध्ये उत्साह आणि श्रद्धा ओसंडून वाहत होती.
आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरकडे जाणार्‍या हजारो भाविकांसाठी रेल्वे प्रशासनाने खासगी विशेष रेल्वे सेवा उपलब्ध करून दिली आहे. अमरावती विभागातून पंढरपूरसाठी ही गाडी पहिल्यांदाच नवीन अमरावती स्थानकावरून रवाना झाली आहे. यावेळी पारंपरिक वाद्यांच्या गजरात गाडीचे स्वागत करण्यात आले. स्टेशन परिसर फुलांच्या सजावटीने सुशोभित करण्यात आला होता. यावेळी खासदार बळवंत वानखडे यांनी प्रवाशांना शुभेच्छा देताना सांगितले की, वारकर्‍यांचा पंढरपूर प्रवास सुखकर होण्यासाठी आणि अमरावतीच्या नागरिकांना थेट सुविधा मिळावी, यासाठी रेल्वे प्रशासनासोबत सातत्याने पाठपुरावा करण्यात आला.
याप्रसंगी रेल्वे विभागाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांसह माजी महापौर मिलिंद चिमोटे, विलास इंगोले, प्रवीण मनोहर, समाधन वानखडे, संजय थोरात, ओमप्रकाश बनसोड, विजय गणवीर, संजय शिरभातेे, सौरभ तायडे, मनोज भेले, दिनेश खोडके, जयश्री वानखेडे, मिताली पाटील आदी उपस्थित होते. प्रवाशांना स्टेशनवर स्वागत किट, पिण्याचे पाणी वितरित करण्यात आले. स्वयंसेवकांकडून सहकार्यही करण्यात आले. गाडी सुटताना ज्ञानोबा माऊली तुकारामच्या जयघोषात संपूर्ण वातावरण भक्तीमय झाले होते.

संबंधित बातम्या

हे सुद्धा वाचा
Close
Back to top button