कौटुंबिक वादातून मुलानेच केली वडिलांची निघृण हत्या

चांदूरबाजारात घडले हादरवणारे हत्याकांड!

*आरोपी अल्पवयीन मुलगा ताब्यात

चांदूरबाजार /8 जून: पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ताजनगर परिसरात शनिवार सायंकाळी एक हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली. कौटुंबिक बाद विकोपाला गेल्यानंतर स्वतःच्या मुलानेच वडिलांच्या पोटात व छातीवर धारदार शस्त्राने वार करत हत्या केल्याची धक्कादायक घटना शनिवारी सायंकाळी सातच्या सुमारास घडली. एजाज खान मेहबूब खान (45) असे मृताचे नाव असून, सध्या चांदूरबाजार येथे राहात होते. याप्रकरणातील संशयित मुलगा आणि पत्नी फरार असून,पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली आहे. एजाज खान आणि त्यांच्या पत्नीमध्ये किरकोळ कारणावरून बाद सुरू होता. यावेळी त्यांचा मुलगा (नाव जाहीर करण्यात आलेले नाही) संतापाच्या भरात पुढे आला आणि बडिलांच्या पोटात व छातीवर धारदार शस्त्राने वार केले. रक्ताच्या थारोळ्यात कोसळलेल्या एजाज खान यांना तातडीने चांदूरबाजार उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती अत्यंत गंभीर असल्यामुळे त्यांना अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले. दुर्दैवाने, उपचारापूर्वीच अँम्बुलन्समध्ये त्यांचा मृत्यू झाला. रुग्णालयातील डॉक्टरांनी एजाज खान यांना मृत घोषित केले असून, मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. चांदूरबाजार पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पुरावे गोळा केले असून, आरोपी मुलगा आणि पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. दोघांचा शोध घेण्यासाठी विशेष पथक तैनात करण्यात आले आहे. गेल्या 24 तासांत अमरावती ग्रामीण भागात ही दूसरी हत्या आहे. शुक्रवारी लोणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत साखरा गावात एकाची हत्या करण्यात आली असून, एका महिलेवर प्राणघातक हल्ला झाला आहे. ती अद्याप जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या आयसीयू ये उपचार घेत आहे. अशातच शनिवारी चांदूरबाजारमध्ये मुलाने वडिलांची हत्या केल्याच्या घटनेने परिसर हादरला आहे. ग्रामीण भागात वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, याबर कठोर कारवाईची मागणी होत आहे. गुन्हेगार लवकरच आमच्या ताब्यात असतील कौटुंबिक वादातून मुलानेच केली वडिलांची निघृण हत्या; आई व मुलगा फरार, पोलिसांचा शोध अमरावती चांदूरबाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ताजनगर परिसरात शनिवार सायंकाळी एक हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली. कौटुंबिक बाद विकोपाला गेल्यानंतर स्वतःच्या मुलानेच वडिलांच्या पोटात व छातीवर धारदार शस्वाने बार करत हत्या केल्याची धक्कादायक घटना शनिवारी सायंकाळी सातच्या सुमारास घडली. एजाज खान मेहबूब खान (45) असे मृताचे नाव असून, सध्या चांदूरबाजार येथे राहात होते. मृतक नेहमीच पत्नी व मुलाला त्रास देत होता.या त्रासाला कंटावळून पत्नी मुलासह धारणीला राहु लागले.तेथेही एजाजखानने त्यांचा पिच्छा सोडला नाही.त्यामुळे पत्नी व मुलगा पुन्हा चांदूरबाजारला आले.याची माहिती मृतकाला मिळताच मृतक चांदूरबाजारचे घरी आला व नेहमीप्रमाणे पत्नीला त्रास देऊ लागला.हा नेहममीचा त्रास असह्य झाल्याने अल्पवयीन मुलाने पित्यावर चाकुने वार करुन जखमी केले. जखमी पित्याचा उपचारापुर्वीच मृत्यु झाला.याप्रकरणातील आरोपी मुलगा हत्या करुन फरार झाला होता. पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली आहे. एजाज खान आणि त्यांच्या पत्नीमध्ये किरकोळ कारणावरून बाद सुरू होता. यावेळी त्यांचा सतरा वर्षीय मुलगा संतापाच्या भरात पुढे आला आणि बडिलांच्या पोटात व छातीवर धारदार शस्त्राने वार केले. रक्ताच्या थारोळ्यात कोसळलेल्या एजाज खान यांना तातडीने चांदूरबाजार उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती अत्यंत गंभीर असल्यामुळे त्यांना अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले. दुर्दैवाने, उपचारापूर्वीच अँम्बुलन्समध्ये त्यांचा मृत्यू झाला. रुग्णालयातील डॉक्टरांनी एजाज खान यांना मूत घोषित केले असून, मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. चांदूरबाजार पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पुरावे गोळा केले असून, आरोपी अल्पवयीन मुलाविरुद्ध भान्यासं 103 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघांचा शोध घेण्यासाठी विशेष पथक तैनात करण्यात आले होते.त्यात मृतकाचा अल्पवयीन मुलगा सुरवातीला फरार झाला त्याचे लोकेशन तपासून त्याला चांदूरबाजार पोलीसांनी लालखडी अमरावती येथून ताब्यात घेण्यात आले.आरोपी अल्पवयिन असल्याने त्याला बालसुधार गृहात रवाना करण्यात आले असून रविवारी चौकशीसाठी चांदूरबाजार येथे आणण्यात येणार असल्याची माहीती पोलीसांनी दिली.घटनेचे गांभीर्य लक्षात घेता अचलपुर उपविभागीय पोलीस अधिकारी शुभमकुमार यांनी घटनास्थळाला भेट देऊन स्थानिक पोलीसांना सुचना केल्या.घटनेचा पुढील तपास ठाणेदार संतोष टाले,सहाय्यक ठाणेदार भुषण बैचाने व विनोद इंगळे करीत आहेत.

संबंधित बातम्या

Back to top button