पाच फुटाच्या अजगराला स्नेक रेस्क्यु टीमने केले रेक्यू
अजगराला दिले सर्पमित्राने जीवनदान

मोर्शी /7 ऑक्टोबर : पावसाळ्याच्या दिवसांत शेतात आणि घनदाट जंगलात विविध जातीच्या सापांसह अजगर निघण्याच्या घटना वाढत असताना, 6 ऑक्टोबर रोजी दुपारी सुमारे तीन वाजता स्वप्नीलभाऊ देवताडे यांच्या शेतात मजूर गवत कापण्याचे काम करत होते. त्या वेळी त्यांना तब्बल पाच फूट लांबीचा अजगर दिसला. अचानक अजगर दिसल्याने घाबरलेल्या मजुरांनी तात्काळ शेतमालकांना दूरध्वनीवरून याची माहिती दिली. शेतमालकांनी तत्काळ सर्पमित्र हर्षल गलपट यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी आपल्या ‘रेक्सु टीम’ला घटनास्थळी बोलावून दिले आणि पाच फूट लांबीच्या अजगराला सुरक्षितरीत्या पकडण्यात स्नेक रेस्क्यू टीमला यश आले. त्यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी लक्ष्मण दुबे यांच्या सहकार्याने त्या अजगराला जीवनदान देत जंगलातील त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. या बचाव मोहिमेत आदित्य पवार यांनी सर्पमित्राला मदत केली. यानंतर सर्पमित्र हर्षल गलपट यांनी मोर्शी आणि वरुड तालुक्यातील नागरिकांना आवाहन केले की, कोणत्याही घरात किंवा शेतात साप किंवा वन्य प्राणी आढळल्यास त्यांनी त्वरित स्नेक रेस्क्यू टीमशी संपर्क साधावा.




