रवीनगर प्रभागातील अनेक सामाजिक कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
आ.सुलभाताई खोडके यांनी केले स्वागत

अमरावती /1 जानेवारी : महाराष्ट्राच्या राजकारणात काही व्यक्तिमत्वाने आपल्या नेतृत्व आणि कार्यशैलीने सर्वसामान्यांपासून ते कार्यकर्त्यांपर्यंत सर्वांनाच भुरळ घातलेली आहे. हे व्यक्तिमत्व फक्त पदांपुरते मर्यादित नाहीत, तर त्यांच्या कार्यशैलीमुळे आणि नेतृत्वगुणांमुळे त्यांना नेहमीच वेगळा मान मिळत आला आहे. अशाच व्यक्तिमत्वानपैकी एक व्यक्तिमत्व म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री- नामदार अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अमरावती मध्ये अधिकाधिक बळकटी देण्याचे कार्य आ.संजय खोडके व आ.सुलभाताई खोडके यांच्याद्वारे केल्या जात आहे.नव्या दिवसाच्या हाती नव्या भविष्याची सूत्रे सोपवून तो काळ भूतकाळात जाऊन बसतो. हाच काळ भविष्याकडे वाटचाल करत असतो. म्हणूनच मागे सरलेल्या काळाची शिदोरी ही भविष्याच्या सुरक्षित वाटचालीकरिता मिळालेली अनुभवांची साठवण असते.राजकारणात कोणीही कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो, तर केवळ ’ हीतसंबंध ’ महत्वाचे असतात.ही बाब हेरून आ.सुलभाताई संजय खोडके यांनी संघटनेत असलेले बळ,सामर्थ्य, संकल्पशक्ती आणि सुरक्षा या त्रिसूत्रीचा अवलंब करीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विस्ताराला गती दिली आहे.सखोल संशोधन, सखोल दूरदृष्टी आणि परिपूर्ण अभ्यासातून ’ सोशल इंजिनिअरिंग ’ च्या माध्यमातून प्रत्येक घटकाला सोबत घेऊन शहराचा विकास करताना मागील वर्षांतील अनुभव, संघर्ष, अपयश आणि यश यांना आठवणीत साठवत, नव्या आशा, नवे संकल्प आणि उज्वल भविष्यासाठी पुढे जाण्याचा निर्धार केला आहे. यादरम्यान अनुभव आणि तरुणाई यांचा समतोल साधत जुन्या सहकार्यांसह नवोदितांना सोबत घेऊन त्यांची लोकसेवेच्या कार्याची अविरतपणे वाटचाल सुरु आहे.त्याचाच परिपाक म्हणून आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात इनकमिंगचे पर्व उदयास आल्याचे चित्र दिसून येत आहे. अशातच गुरुवार दिनांक 1 जानेवारी 2025 रोजी प्रभाग क्रमांक – 17 गडगडेश्वर – रवी नगर येथील दिवाकर उर्फ डेव्हीड गवई, अतुल भिलकर, अविनाश जैन, मुकेश चढार, रोहन ठाकरे, विनोद तायडे, राजेश कोठारी, हुकूम यादव, सोमेश तरोडे, तुषार काठोळे, गजानन किन्नायके, श्याम खाडे, पंकज गावंडे, अनिल गुल्हाने यांनी बहुसंख्य सामाजिक कार्यकर्त्यांनी आमदार – सौ. सुलभाताई संजय खोडके यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश घेतला. या शब्दांत नवप्रवेशितांनी आमदार – सौ. सुलभाताई खोडके यांच्या नेतृत्वात प्रवेश क्षणी आपल्या भावना व्यक्त केल्यात. यावेळी यश सुलभा संजय खोडके यांच्या समवेत प्रा. डॉ. अजय बोन्डे, सरोज गोपाल चिखलकर, आशिष कपले, सुमित सरकटे आदीसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व सदस्य व पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.




