जिल्हाधिकारी कार्यालयात संत संताजी जगनाडे महाराज जयंती साजरी

अमरावती /8 डिसेंबर : जिल्हाधिकारी कार्यालयात आज संत संताजी जगनाडे महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी संत संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी गोविंद दानेज, निवासी उपजिल्हाधिकारी संतोष काकडे, उपजिल्हाधिकारी विवेक जाधव, निवडणूक उपजिल्हाधिकारी शिवाजी शिंदे, नगरपालिका प्रशासन सहायक आयुक्त विकास खंडारे, जिल्हा नियोजन अधिकारी वर्षा भाकरे, जिल्हा खनिकर्म अधिकारी प्रणिता चापले, जिल्हा पुरवठा अधिकारी निनाद लांडे, अधीक्षक निलेश खटके, विधी अधिकारी नरेंद्र बोहरा, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सुरेंद्र रामेकर आदी उपस्थित होते. उपस्थितांनी संत संताजी जगनाडे महाराजांच्या प्रतिमेस पुष्पार्पण करून अभिवादन केले.

संबंधित बातम्या

Back to top button