रुद्रावतार ढोल-ताशा पथकाचा देशभरात डंका

अमरावतीच्या पथकाचा देशभरात कलाविष्कार; ‘रुद्रावतार’चा डंका आता 3 राज्यांत

अमरावती /31 ऑगस्ट -गणेशोत्सव 2026 सुरु होण्यास आता केवळ 14 दिवसांचा कालावधी शिल्लक राहिला आहे. यावर्षी चेन्नईतही घुमणार गजर पंकज तायडे यांनी माहिती दिली की, यावर्षी रुद्रावतार पथकाला चेन्नईतून विशेष आमंत्रण मिळाले आहे. तिथे ढोल-ताशांचा गजर केला जाईल.
याशिवाय हैदराबाद तसेच मध्य प्रदेश, छत्तीसगड, उत्तर प्रदेश आणि ओडिशा येथेही रुद्रावतारच्या वादन टुरचे नियोजन झाले आहे. फक्त अमरावतीपुरते मर्यादित नाही मध्य प्रदेशातील इंदूर, खरगोन, बुरहानपूर, भोपाळ या शहरांत ढोल-ताशांच्या गजरासह मराठी संस्कृतीचे दर्शन घडवले आहे. हैदराबादमध्ये दरवर्षी 10 दिवसांच्या गणेशोत्सवासाठी पथकाला विशेष बोलावणे येते. उत्सवानुसार वादन हनुमान जयंतीला शौर्य आणि वीरतेने नटलेले वादन, राम नवमीला राम भक्तीचा अनुभव, तर गणेशोत्सवात बाप्पाच्या स्वागतात ऊर्जेने भरपूर वादन केले जाते.
याशिवाय नवरात्रीमध्ये देवी स्तुती, गरबा आणि दांडियासाठी हे पथक विशेष वादन करते. पथकात तरुणांचा मोठा सहभाग पथकामध्ये धीरज तायडे, पंकज तायडे, वैभव धोटे, अभिजित कल्हे, तुषार तांतरपले, धीरज वानखडे, अक्षय दलवी, अंकुश खोडे, ऋषी राऊत, नाविण्य गंदे, अनुराग गावंडे, रोहित भाकरे, ऐश्वर्या जोशी, शामल वानखडे, चंचल ढोले, प्रिया गेडाम, नंदिनी वासावकर, आचल वानखडे, प्रणाली दुर्गे, सेजल खंडारे, प्रज्वल धुमाळे, शांतनु डिंके, अथर्व काले, निखिलेश ऊईके, रजत बिजवे, अभि घाटे, गौरव पाटील, ऋषिकेश अढाऊ, कृष्णा पाचंडे, तनूश्री बाबुलकर यांसारख्या अनेक तरुणांचा सहभाग आहे.

संबंधित बातम्या

Back to top button